शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्टवादीचे रेल रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:39 IST

सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणामुळे सव्वा कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. परंतु सरकारच्या या अपयशी धोरणांमुळे असलेले रोजगार गमावण्याची वेळ जनतेवर आली आहे.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे थांबवून सरकारचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे सुरक्षा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ‘जॉब दो जवाब दो, फसवणीस सरकार जॉब दो’ अशा घोषणा देत कार्यकर्ते रेल्वेस्थानकात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी अडविले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे थांबवून सरकारचा निषेध केला.

सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणामुळे सव्वा कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. परंतु सरकारच्या या अपयशी धोरणांमुळे असलेले रोजगार गमावण्याची वेळ जनतेवर आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मुलांना नापीक पदरात पडली असताना दुस-या क्षेत्रातही रोजगार या सरकारने ठेवला नाही. सरकार राजकीय पोळी भाजण्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर करत आहे. साडेचार वर्षांत सरकारने पोकळ आश्वासने दिली, अभ्यास करून उत्तरे देऊ या भूमिकेपलीकडे काही केले नाही. शिक्षण घेऊनही हाताला रोजगार नसल्यामुळे हताश झालेले अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रेल रोको आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सचिन पिंगळे, योगेश निसाळ, अ‍ॅड. चिन्मय गाढे, धिरज बच्छाव, सुनील कोथमिरे, विजय जाधव, शिवराज ओबेरॉय, डॉ. संदीप चव्हाण, श्याम हिरे, हिमांशू चव्हाण, रेहान शेख, राजू उफाडे, नदीम शेख, गणेश गायधनी, जयराम शिंदे, संदेश टिळे, निखिल भागवत, तुषार खांडबहाळे, दीपक गायकवाड, गोरख ढोकणे, रवि बस्ते आदी उपस्थित होते.(फोटो १८ एनसीपी)

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस