घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलनकिमान वेतनाची मागणी : कामगार उपआयुक्तांची मध्यस्थीनाशिक : कामगार उपआयुक्तांनी सुधारित किमान वेतन अदा करण्याचे पत्र देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गेल्या महिनाभरापासून महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या मांडणाऱ्या घंटागाडी कामगारांनी मंगळवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. दरम्यान, कामगार उपआयुक्तांच्या मध्यस्थीनंतर सकाळी ११ वाजेनंतर घंटागाडी कामगारांनी आंदोलन मागे घेतले; परंतु जोपर्यंत किमान वेतन हाती पडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आस्थापनेवरील कामगारांना २४ फेब्रुवारी २०१५ पासून सुधारित किमान वेतन लागू करण्याची अधिसूचना औद्योगिक व कामगार मंत्रालयाने काढली आहे. या अधिसूचनेनुसार कामगार उपआयुक्तांनी नाशिक महापालिकेलाही पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून संघर्ष केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी कामगार उपआयुक्तांच्या पत्राची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना दिले. आरोग्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही कामगारांनी संशय व्यक्त केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांच्या अनामत रकमेतून कामगारांचे वेतन करण्याचे आदेशित केले. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर मंगळवारी सकाळी घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले. सकाळी ७ वाजता घंटागाडी कामगारांनी वाहनतळावरच ठाण मांडत महापालिका प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या. सर्व वाहने वाहनतळावरच थांबविण्यात आली. दरम्यान, कामगार उपआयुक्तांनी घंटागाडी कामगारांना चर्चेसाठी बोलावत आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या महापालिकेला चार पट दंड आकारण्याचे आणि कामगारांना सुधारित किमान वेतन अदा करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कामगार उपआयुक्तांच्या आश्वासनानंतर घंटागाडी कामगारांनी सकाळी ११ वाजता आपले आंदोलन मागे घेतले.
घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: November 10, 2015 23:26 IST