शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:25 IST

मालेगाव बाजार समिती आवारातील मोकळ्या मैदानावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया गुदामाला विरोध दर्शविण्यासाठी चार दिवसापासून बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त गाळेधारक व्यापाºयांनी कॅम्प रोडवरील वाहतूक अडवून रास्ता रोको केला. नवनिर्वाचित राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देविरोध : व्यापाऱ्यांची घेतली दादा भुसे यांची भेट

मालेगाव : मालेगाव बाजार समिती आवारातील मोकळ्या मैदानावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया गुदामाला विरोध दर्शविण्यासाठी चार दिवसापासून बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त गाळेधारक व्यापाºयांनी कॅम्प रोडवरील वाहतूक अडवून रास्ता रोको केला. नवनिर्वाचित राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.बाजार समिती कार्यक्षेत्रातील व्यापारी, आडते यांनी बंद पुकारला असून, संचालकांनी मध्यस्थी न केल्याने तोडगा निघू शकलेला नाही. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केल्याने व्यापारी संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून निषेध व्यक्त केला. यावेळी व्यापारी एकजुटीचा विजय असो, मार्केट गेट खुले करा अशा घोषणा देण्यात आल्या.कॅम्प रस्त्यावर अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. बाजार समितीचे व्यापारी, आडते यांच्यासह आंदोलकांनी राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांचे संपर्क कार्यालय गाठले. भुसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आपण स्वत: व्यापारी संघटनेचे भिका कोतकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. प्रत्येक घरात वाद होतात; दोघांनी एकत्र बसून वाद मिटवायला हवा, आंदोलन करण्यापूर्वी आपण माझ्याशी संपर्क साधला का, असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित करून बाजार समिती संचालक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची एकत्रित समोरा समोर बैठक घेऊन वाद मिटविण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर सोनवणे, विनोद वाघ, संजय घोडके, फकीरा शेख, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.तोडगा काढण्याचे आश्वासनमालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मोकळ्या भूखंडावर गुदाम उभारु नये या मागणीसाठी आंदोलन करणाºया व्यापाºयांनी राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची संपर्क कार्यालयात भेट घेतली. व्यापाºयांशी चर्चा करून भुसे यांनी या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रStrikeसंप