शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पळसे येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2017 00:46 IST

नाशिकरोड : पळसे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी पळसे येथे नाशिक-पुणेरोड महामार्ग रोखून रस्त्यावर भाजीपाला फेकून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : संपावर असलेल्या पळसे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी पळसे येथे नाशिक-पुणेरोड महामार्ग रोखून रस्त्यावर भाजीपाला फेकून दिला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोेषणाबाजी करण्यात आली. रविवारी सकाळी सुमारे तीनशे ते चारशे शेतकरी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर जमा झाले व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. आंदोलक शेतकऱ्यांनी कांदा व इतर भाजीपाल्यासह दूध महामार्गावर ओतून दिले. या प्रकारामुळे सुमारे अर्धातासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर दोन्हीही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस उपनिरीक्षक भीमराज गायकवाड आदींचे पथक पळसे येथे पोहचताच आंदोलनकर्ते शेतकरी महामार्गावरून दूर झाले.घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पळसे येथे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून सरकारच्याच विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ आगळे यांच्यासह माजी सरपंच नवनाथ गायधनी, सरपंच देवीदास गायधनी, गणपत गायधनी, बालाजी एखंडे, रामकृष्ण गायखे, संजय गायधनी, शिवाजी गायखे, प्रमोद गायधनी, दिनकर गायधनी, वसंत गायधनी, मनसेचे सुनील गायधनी, अनिल गायधनी, नामदेव आगळे, ज्ञानेश्वर गायधनी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.पळसे येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला.