शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको

By admin | Updated: June 6, 2017 02:43 IST

दिंडोरी : शेतकरी किसान क्रांतीच्या वतीने पुकारलेल्या बंदला दिंडोरी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

 लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : शेतकरी किसान क्रांतीच्या वतीने पुकारलेल्या बंदला दिंडोरी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दिंडोरी शहरासह तालुक्यातील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दिंडोरी येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास पालखेड चौफुलीवर सर्वपक्षीयांनी रास्ता रोको केला. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेना शहरप्रमुख रमेश बोरस्ते, माजी सभापती सदाशिव शेळके, नरेश देशमुख, रघुनाथ पाटील, सोमनाथ जाधव, रणजित देशमुख, दत्तात्रेय शेळके, नरेंद्र पेलमहाले, संजय बोरस्ते, रावसाहेब बोरस्ते, उल्हास बोरस्ते, माकपचे तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी, रवींद्र मोरे, रणजित देशमुख, जयश्री सातपुते आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी भाजपा सरकार हे शेतकऱ्यांमध्ये फुट पडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अजूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. नितीन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्या सरकारने मान्य करायलाच पाहिजे असे विचार मांडले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दिवसभर संपूर्ण व्यापारी विक्रेते यांनी दुकाने बंद ठेवत शेतकरी बंदला पाठींबा दिला. या वेळी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. शेतकऱ्यांच्या या संपात किसान सभाही उतरली असून या संघटनेत सर्वाधिक शेतमजूर असून त्यांनी रास्त रोको आंदोलनात सक्र ीय सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी किसान सभेच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.आज शेतकरी किसान क्र ांती मोर्चाने बंदची हाक दिल्याने यात तालुक्यातील भारतीय किसान सभा सामील झाली होती. किसान सभेच्या वतीने बाजार समिती पटांगण ते तहसील कार्यालयावर कॉ सुनील मालसुरे, तालुका सेक्र ेटरी रमेश चौधरी, दौलत भोये, लक्ष्मीबाई काळे, अनिता कुवर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, या वेळी तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना निवेदन देण्यात आले,तालुक्यातील मोहाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली येथे जि. प. सदस्य प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, विलास पाटील, राजेंद्र कळमकर, संजय गोवर्धने, रामभाऊ मौले यांसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. यावेळी दुध रस्त्यावर ओतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. अनेक आंदोलने होत असताना नेहमी शासकीय मालमत्तेचे नुकसान केले जाते मात्र शेतकऱ्यांचे आंदोलना कुठेही शासकीय किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान केले गेले नाही फक्त संप काळात शेतमाल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून विविध मार्गांवर करण्यात आला. यावेळी काही ठिकाणी शेतमाल रस्त्यावर फेकत निषेध झाला. काही ठिकाणी काही युवकांनी आततायी पणा केला मात्र कुणालाही मारहाण किंवा वाहनांचे नुकसान केले गेले नाही. परंतु पोलिसांनी तिसऱ्या दिवशी सदर शेतमाल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न दंडुक्याच्या जोरावर हाणून पाडल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच्या दडपशाही भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.