शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड, नामपूरला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:23 IST

कांदा भावात घसरण : शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दोन तास रास्ता रोको केला.

नामपूर येथे रास्ता रोकोनंतर शेतकºयांशी संवाद साधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक खैरनार.

कांदा भावात घसरण :  शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद

नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दोन तास रास्ता रोको केला.यंदा मोसम खोºयात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. गत महिनाभरापासून कांद्याला चांगला भाव मिळत होता; मात्र शहरी भागात ग्राहकाला महागडा कांदा खरेदी करावा लागत असल्यामुळे शेतकºयाकडून कांदा खरेदी करून साठेबाजी करणाºया व्यापाºयाच्या शेडवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाºयांनी अचानक धाडी टाकल्या. यात नामपूर येथील एका व्यापाºयाच्या शेडवर या पथकाने तपासणी करून कार्यवाही केल्यामुळे नामपूरच्या सर्व व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद पाडले. यात कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे संतप्त झाले. त्यांनी मार्केटच्या गेटसमोर सुमारे दोन तास रास्ता रोको केला. नामपूर बाजार समितीत दुपारी४ वाजता लिलाव सुरूकरण्यात आले; मात्र बाजारभाव सरासरी एक हजारपर्यंत पुकारण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक प्रचंड नाराज झाल्याचे चित्र होते. आर्थिक टंचाई, मजूर टंचाई, पावसाचे वातावरणमुळे नामपूर मार्केट येत्या मंगळवारपर्यंत बंदठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सचिव संतोष गायकवाड यांनी दिली. कांद्यास किमान दोन हजार रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार, काँग्रेसचे प्रवीण सावंत, समीर सावंत, मधुकर कापडणीस यांनी करून भाजपा शासनाचा निषेध केला. या रास्ता रोकोप्रसंगी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, मंडळ अधिकारी सी.पी. अहिरे, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देऊन व्यापारी व शेतकºयांच्या अडचणी समजून घेतल्या.चांदवडला संतप्त शेतकºयांचे ठिय्या आंदोलनचांदवड : शहरातील कांदा व्यापाºयावर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी छापे टाकल्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कांदा व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. सकाळपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० ते ३०० टॅक्टर व पिकअपमधून ग्रामीण भागातील शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. सकाळी १० वाजता लिलावास प्रारंभ होईल या अपेक्षेवर शेतकरी लिलाव सुरू होण्याची वाट पाहत होते. बाजार समितीत जाऊन त्यांनी चौकशी केली असता आता लिलाव सुरू होईल. थोड्या वेळ्याने लिलाव सुरू होईल, अशी उत्तरे मिळाल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. लिलाव सुरू होत नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.संतप्त शेतकºयांचा ताफा मुंबई आग्रारोडकडे रास्ता रोको करण्यास निघाला. घटनेचे वृत्त वाºयासारखे समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी हे पेट्रोलपंप चौफुलीवर आले. त्यांनी संतप्त शेतकºयांना शांत करून आपण लगेच बाजार समितीत जाऊन लिलाव सुरू करण्यास सांगू, असे सांगून सर्वच शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले. संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी आम्ही सकाळपासून आलो मात्र आमचे कांदा लिलाव होत नाही, यावर नाराजी व्यक्त करीत बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, संचालक विलास ढोमसे, निवृत्ती घुले, संजय जाधव, चंद्रकांत व्यवहारे, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, युवानेते राहुल कोतवाल, समाधान जामदार यांच्यासमवेत व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक सभागृहात झाली. यावेळी व्यापाºयांनी आयकर विभागाच्या धाडीबरोबरच आम्हाला अवघा ५०० क्विंटल कांदा स्टॉक करण्याची परवानगी असताना आम्ही कांदा खरेदी करून अजून कुठे अशा धाडींना सामोरे जाऊ याकरिता आम्ही कांदा लिलाव सुरू करणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र डॉ. कुंभार्डे, नितीन अहेर व संचालकांनी विनंती केली.व्यापाºयांनी आजच्या दिवस तरी शेतकºयांची अडचणी व दूर करून एवढा माल आणल्याने लिलाव करावा असा आग्रह केल्याने त्यांची विनंती मान्य करीत आजचा दिवस लिलाव सुरू केले. मात्र आजचा बाजारभाव ७०० ते ११०० रुपयेपर्यंत राहील व आज व्यापाºयांनी बॅँकेतून पैसे न आणल्याने या मालाचे पैसे २४ तासात देऊ, असे सांगून लिलाव दुपारी ३.३० वाजता सुरू झाले; मात्र उद्यापासून चांदवड बाजार समितीत व्यापाºयांचा बंद असल्याने पुढील निर्णय होईलपर्यंत शेतकºयांनी कांदा आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.