शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

थांब्यासाठी बस रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:00 IST

उमराणे : येथे महामार्गावरील बसथांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा देण्यात यावा व रामदेवजीबाबा फाटामार्गे जाणाºया बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांची धांदल उडाली. यावेळी पुन्हा एकदा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देउमराणे : अधिकाऱ्यांची धांदल; आश्वासनानंतर आंदोलन मागे

उमराणे : येथे महामार्गावरील बसथांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा देण्यात यावा व रामदेवजीबाबा फाटामार्गे जाणाºया बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांची धांदल उडाली. यावेळी पुन्हा एकदा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या नेतृत्वाखाली उमराणे ग्रामस्थांच्या वतीने बस रोको आंदोलन छेडण्यात येणार होते; परंतु नाशिक व मालेगाव विभागाच्या वाहतूक नियंत्रकांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. तरीही बसेस थांबत नसल्याने बुधवारी (दि. १८) शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक बस रोको आंदोलन केल्याने एकच धांदल उडाली.१८ ते २० हजार लोकसंख्या असलेले उमराणे गाव हे परिसरातील आठ ते दहा खेड्यांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू असून, कांद्याची बाजारपेठ, बॅँका, शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय आदी असल्याने शिवाय गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथून उमराणेसह परिसरातील शालेय विद्यार्थी व बहुतांशी नागरिकांना धुळे, मालेगाव, चांदवड, नाशिक आदी ठिकाणी दैनंदिन प्रवास करावा लागतो.त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्यामुळे रामदेवजीबाबामार्गे जाणाºया सर्व बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन मंडळाकडे लेखी निवेदने देण्यात आली होती. तरीही परिवहन महामंडळाकडून या निवेदनांची दखल घेतली जात नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून उमराणे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळेसही आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाचीही पूर्ती झाली नाही. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी कोणत्याही नेतृत्वाची वाट न पाहता बस रोको आंदोलन छेडत आपला राग व्यक्त केला. इशारा देणाºयांकडूनच समजूतयापूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी आंदोलनाच्या एक दिवस आधीच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून नाशिक-इगतपुरी, धुळे-इगतपुरी या गाड्यांना तत्काळ थांबा देण्याचे आणि नांदगाव-सप्तशृंगगड ही गाडी उमराणेमार्गे वळविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच थांब्यावर पंधरा दिवसांसाठी एका वाहतूक नियंत्रकाचीही नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु आश्वासनानंतरही बस थांबत नसल्याने प्रवाशांचा संतापाचा बांध फुटला. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच विलास देवरे, पं.स. सदस्य धर्मा देवरे, ग्रा. पं. सदस्य सचिन देवरे यांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढत गाड्या थांबविण्याचे आवाहन चालकांना केले.बस रिकाम्या असतानाही थांबा नसल्याकारणास्तव तसेच बहुतांश चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे परिवहन महामंडळाच्या गाड्या येथे थांबत नाहीत. त्याचप्रमाणे मालेगाव, कळवण, धुळे आगाराच्या बहुतांश बसेस रामदेवजी फाटामार्गे जात असल्याने उमराणे येथील शालेय विद्यार्थ्यांना देवळा, कळवण, मालेगाव येथे जाण्यास वेळेवर बस उपलब्ध होत नाही.