नाशिक : उपनगर परिसरातील महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीवर शनिवारी (दि़१०) मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे़ सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून, खिडक्यांच्या काचा फुटून किरकोळ नुकसान झाले आहे़ या ठिकाणी झालेल्या युवकाच्या खुनानंतर तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त हटविण्यात आल्याचे वृत्त असून, यानंतर दगडफेकीची घटना घडली आहे़ शनिवारी (दि़१०) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी या वसाहतीवर दगडफेक केली़ त्यामध्ये अनेक घरांच्या खिडक्यांचा काचा, वीज व पाण्याचे मीटरचे नुकसान झाले आहे़ या परिसरातील महाराष्ट्र स्कूलजवळ २४ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास योगेश शुद्धोधन पवार (रा़ नवीन चाळ) या युवकाची पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खुनाची घटना घडली होती़ उपनगर परिसरात खंडणीसाठी धमकी, चेन स्रॅचिंग, वाहनांची तोडफोड, प्राणघातक हल्ले या घटना नित्याच्याच झाल्या असून, उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़
सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीवर दगडफेक
By admin | Updated: October 11, 2015 23:22 IST