नाशिक : अभियांत्रिकी विद्याशाखेचा निकाल जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे; मात्र मागणी करूनही विद्यार्थ्यांना अद्यापही उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी मिळाली नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय कार्यालयात निदर्शने केली. यावेळी समन्वयक नसल्याने त्यांच्या खुर्चीवर दगड ठेवून आंदोलन करण्यात आले. अभियांत्रिकी निकालानंतर गोंधळाची परिस्थिती कायम आहे. काही विद्यार्थ्यांना कॉपी मिळाली तीही चुकीची असून काहींना अजूनही झेरॉक्स कॉपी मिळालेली नाही.
खुर्चीवर बसविला दगड
By admin | Updated: September 2, 2016 23:24 IST