शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी जलप्रवासाची साक्ष देताहेत दगडी धक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:44 IST

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्यासाठी जलप्रवास हाच पर्याय होता नावेतून प्रवास करण्याच्या अनेक पाऊलखुणा आजही टिकून आहेत. 

ठळक मुद्देदिनविशेष गोदावरी प्रकट दिन २२५ वर्षांपूर्वीच्या खुणा; मनोरे संवर्धन करण्याची जानी यांची मागणी

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्यासाठी जलप्रवास हाच पर्याय होता नावेतून प्रवास करण्याच्या अनेक पाऊलखुणा आजही टिकून आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या व्हिक्टोरिया ब्रिजपूर्वी अनेक वर्ष अगोदर म्हणजे सुमारे २२५ वर्षांपूर्वी ही व्यवस्था होती. गोदा जलमार्गातील नाव बांधण्यासाठी त्यावेळी असलेल्या  जुन्या दगडी धक्क्याच्या खुणा आजही उपलब्ध आहेत. त्याबाबत विविध पुस्तकातून त्याची माहिती घेऊन इतिहास अभ्यासक देवांग जानी या खुणा शोधून काढल्या आहेत. नाशिकचा पुरातन इतिहास असलेल्या या दगडी वास्तू जतन करण्याची मागणी जानी यांनी केली आहे. १८९५ पूर्वी पंचवटी ते नाशिक जाण्यायेण्यासाठी एकमेव जलमार्ग होता. त्याकाळी पंचवटीतून नाशिक किंवा नाशिकहून पंचवटीत जाण्यायेण्यासाठी गोदावरी नदीतून नावेद्वारे प्रवास करावा लागत असे. त्यासाठी टाळकुटेश्वर देवळाजवळ नाव उपलब्ध होत असे. तेथून नावेत बसून  लोक जा ये करीत असे. नदीच्या दोन्ही तिराला उंच मनोरे दगडात बांधलेले असत. त्यावर लोखंडी साखळीने नावा बांधीत असत. पंचवटी अमरधामसमोर आणि नाशिक अमरधाम बाहेरील बांधलेले दगडी धक्के अजूनही सुस्थितीत आढळतात. नावेमध्ये प्रवासासाठी व्यक्ती मागे १ आणा दर आकारला जात असे. पावसाळ्यात पाणी कमी झाल्यावर, चांदवडकर यांच्या सांडव्यावर हमाल लोक उभे असत. हमाल लोक मनुष्याला पाठीवर घेऊन पलीकडे पोहचविण्यासाठी मजुरीपोटी एका खेपेस सहा पै घेत असे. n  नदीच्या किनारी असलेल्या धक्क्याच्या ठिकाणी नाव उभ्या केल्या जात असल्याने  या भागाचे नाव नाव दरवाजा असे पडले, अशीही नोंद आढळल्याचे जानी सांगतात. पुढे अनेक वर्षे नौकेद्वारे होणाऱ्या गैरसोयी बघून नाशिक शहराचे तत्कालीन असिस्टंट कलेक्टर व नाशिक नगरपालिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष काशिनाथ महादेव थत्ते यांच्या पुढाकाराने ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया पूल बांधला. पुलाचे उदघाटन तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हेरीस यांनी १४ जानेवारी १८९५ ला केले त्याची साक्ष पुलाखालील तक्ति आजही  देत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी