शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलऐवजी मिळाला ‘दगड’

By admin | Updated: October 27, 2015 23:05 IST

झटका: आँनलाइन खरेदीतील प्रकार

विंचूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन खरेदीसाठी भरघोस सूट देऊन बहुतांशी कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित केले जात असले तरी खरेदी करताना थोडी सावधानता बाळगा..! अन्यथा खरेदी केलेल्या महागड्या वस्तुऐवजी तुमच्या हातात ‘दगड’ मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. संबंधित कंपनीने पैसे किंवा वस्तू देण्यास नकार दिल्याने ग्राहकास आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.त्याचे झाले असे, लासलगाव येथील किशोर जाधव यांनी एका खासगी कंपनीकडे साडेतीन हजार रुपये किमतीचा मोबाइल आॅनलाइन बुक केला. कॅश आॅन डिलिव्हरी (वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याची सोय) नसल्याने त्यांनी कंपनीस बँक खात्यातून आॅनलाइन पैसे जमा केले. चार दिवसानंतर पोस्टाद्वारे वेष्टनात गुंडाळलेला बॉक्स त्यांना मिळाला. बॉक्स उघडल्यानंतर त्यांना मोबाइलऐवजी दगड आढळला. त्यांनी तत्काळ संबंधित कंपनीचे संकेतस्थळ उघडून मोबाइलऐवजी दगड मिळाल्याचे नमूद करीत वस्तू परत करण्यासंदर्भातील प्रकिया पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. दगडरुपी वस्तू कुरीअरद्वारे परत करण्याचे सांगण्यात आल्याने जाधव यांनी बॉक्स कंपनीकडे पाठवला. त्रास सहन करावा लागल्याचे दु:ख असतानाच कंपनीकडून मोबाइल पाठविला जाईल, अशी अपेक्षा करणाऱ्या या ग्राहकास कंपनीने दुसरा झटका दिला. त्यांना कंपनीचा इमेल मिळाला. सात दिवसांचा परत करण्याचा अवधी संपल्याने तुम्हाला वस्तू पाठवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. ईमेल वाचून या ग्राहकास धक्काच बसला. हातात ‘दगड’ मिळताच कंपनीला माहिती देऊन व वस्तू परत पाठवूनही विलंब झाल्याचे कारण देत असल्याने जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केले. टाळाटाळ करणाऱ्या कंपनीला मेलद्वारे संपर्क करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने ‘तेलही गेले अन् तूपही गेले’.. अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)