शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात पकडले चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:08 IST

तापी नदीमधून वाळू तस्करी करणारी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांनी बोगस परवाने तयार करून वाळूची तस्करी करणारे चार ट्रक पकडले. ही कारवाई सटाणा देवळा रस्तावरील मोरेनगर नजीक करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

सटाणा : तापी नदीमधून वाळू तस्करी करणारी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांनी बोगस परवाने तयार करून वाळूची तस्करी करणारे चार ट्रक पकडले. ही कारवाई सटाणा देवळा रस्तावरील मोरेनगर नजीक करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.गेल्या चार महिन्यांपूर्वी जायखेडा व सटाणा पोलिसांनी वाळू तस्करी विरु द्ध संयुक्त मोहीम उघडली होती. या मोहिमेत तब्बल बारा ट्रक चोरीची व क्षमतेपेक्षा जास्त वाळू घेऊन जाणारे ट्रक पकडले होते. या कारवाईत सुमारे ४२ लाख रु पयांचा दंड महसूल विभागाने वसूल केला होता. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे अक्षरश: तोंडचे पाणी पळाले होते. मोठ्या रक्कमेच्या दंड वसुलीमुळे गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीला आळा बसला होता; मात्र गेल्या आठ दिवसांपासून वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आज गुरु वारी दुपारी चारही मालट्रक नंदुरबारहून तापी नदीपात्रातील वाळू घेऊन जात होते. बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांना वाळू चोरीचा संशय आल्याने त्यांनी मोरेनगरजवळ चारही ट्रक अडवून तपासणी केली असता बनावट परवाने आढळून आले. भरारी पथकाने चारही वाळूचे ट्रक जप्त केले असून सायंकाळी उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रि या सुरू होती.