शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे बैल सापडले; खुन्यांचा तपास लागेना

By admin | Updated: September 13, 2014 00:55 IST

चोरीचे बैल सापडले; खुन्यांचा तपास लागेना

 

मालेगाव : शहरालगतच्या वडगाव शिवारात सालदाराचा खून करून लंपास करण्यात आलेली बैलजोडी कॅम्प रस्त्यालगत सापडली. मात्र या जनावरचोर व खून करून फरार झालेल्या आरोपींचा तपास करण्यात अद्याप पोलीस प्रशासनास यश आलेले नाही.गेल्या काही महिन्यांमध्ये शहर - तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण कसमादे पट्ट्यातूनच शेतोपयोगी जनावरांची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेला शेतकरी पूर्णपणे वैतागलेला आहे. आता तर जनावरांची चोरी करण्यासाठी शेतकऱ्यांचेच खून होत असल्यामुळे शहर - तालुका व कसमादे भागातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे असताना पोलीस प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प असून, शेतोपयोगी जनावरांची चोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे. मंगळवारी रात्री आठ ते पहाटे सहादरम्यान शहरालगतच्या वडगाव शिवारात हरिलाल अस्मर यांच्या शेतात जनावरांच्या गोठ्यात खाटेवर झोपलेल्या कोळजी चव्हाण (७०) वर्षीय वृद्ध सालदाराच्या अज्ञात चोरट्यांनी फावड्याच्या दांड्याने खून केला. त्यानंतर त्यांनी मोठ्या शिताफीने कुणाला चाहुल लागू न देता ७० हजार रुपये किमतीची खिल्लारी बैलजोडी चोरून नेली. त्यामुळे सदर खून हा उघड उघड जनावरांच्या चोरीसाठी असल्याचे स्पष्ट आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. दोन महिन्यांपासून परिसरात जनावरांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार त्यांनी त्यांच्याकडे केली होती. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहर - तालुक्यासह कसमादे भागातील शेतकऱ्यांमध्ये व शेतमळ्यांमध्ये राहणाऱ्या तसेच राखणदारीची जबाबदारी असणाऱ्या सालदार - मजूर वर्गामध्ये जनावरे चोर व खुनी टोळीची भीती निर्माण झाली आहे. सतत शेतोपयोगी जनावरे चोरी जाण्याच्या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवसाय व एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर त्याचा झालेला दुष्परिणाम आता दिसू लागला आहे.