शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या १४ दुचाकी जप्त

By admin | Updated: July 26, 2014 00:54 IST

दोघांना अटक : पंचवटी पोलिसांची कारवाई

पंचवटी : परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला इमारतीच्या वाहनतळातून तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने तसेच हॅँडल लॉक तोडून चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघा भामट्यांकडून तब्बल सात लाख रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेले दोघेही संशयित हे कोपरगाव येथील असून, त्यांनी यापूर्वीही अनेक दुचाकी चोरल्या असण्याची शक्यता व्यक्तकेली आहे. पोलिसांनी या संशयितांनी शिर्डी, कोपरगाव तसेच अन्य भागांत चोरून नेलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यात तीन बुलेट, दोन पल्सर, यामाहा आरवन फाईव्ह, चार स्प्लेंडर, चार बजाज तसेच अन्य कंपनीच्या जवळपास एकूण १४ दुचाकी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोपरगाव येथील अमोल लक्ष्मण पारे व शिर्डीतील गणेश नंदकिशोर अहेर या दोघांना अटक केली आहे. दोघांनीही पंचवटीतून अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने या दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. हे दोघे पंचवटीत दुचाकी चोरीसाठी येणार असल्याचे कळल्याने पोलिसांनी सापळा रचला व दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. संशयितांनी चोरी केलेल्या वाहनांचे सुटे भाग बदलणे तसेच नंबर क्रमांकात खाडाखोड करून त्या वापरात आणल्या होत्या. या संशयितांनी शहरातही दुचाकी चोरी केल्याची शक्यता असून, त्याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहाय्यक पोलीस आयुक्तरवींद्र वाडेकर यांनी दिली. पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे विजय गवांदे, संजय पवार, भगीरथ नाईक, येवाजी महाले, राजू राऊत, विजय वरंदळ, मुन्ना वाघमारे, लोखंडे, कोकाटे आदिंनी ही कारवाई केली आहे. (वार्ताहर)