शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर फेअर प्रदर्शन : इतिहासकालीन नाणी, देशी-विदेशी नोटाचलन पाहण्यासाठी गर्दी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:52 IST

नाशिक : दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे नाशिककर प्रेक्षक अचंबित झाले होते.

ठळक मुद्देनाण्यांचा एक अनोखा खजिनाशिवराय कालीन नाण्यांचा संग्रह

नाशिक : दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मिळ वस्तू, तांब्या-पितळ्याच्या व इतर धातुंच्या मूर्ती, परदेशी चलनातील नोटा व नाणी, टोकन, बॅच, शिवकालीन शस्त्रास्त्रे, अस्त्रे असा मौल्यवान खजिना, तितक्याच निगुतीने मांडलेले त्याचे प्रदर्शन, प्रत्येक स्टॉलवर त्याची माहिती देण्यास सरसावणारे इतिहासप्रेमी अभ्यासक, आजवर पुस्तकात अभ्यासलेले इतिहासकालीन नाणी, नोटांचे होत असलेले प्रत्यक्ष दर्शन यामुळे नाशिककर प्रेक्षक अचंबित झाले होते. निमित्त होते ‘रेअर फेअर’ नाणे प्रदर्शनाचे. कलेक्टर्स सोसायटी आॅफ न्युमिसमॅटिक अ‍ॅँड रेअर आयटम्स यांच्या वतीने या प्रदर्शनाला शुक्रवारी (दि.५) दिमाखात प्रारंभ झाला. इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या उद््घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी बी., राधाकृष्ण, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, इतिहास अभ्यासक गिरीश टकले, यशवंत निकुळे, संस्थाध्यक्ष अनंत धामणे, सचिव अ‍ॅड. राजेश जुन्नरे, खजिनदार राहुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. रविवार (दि.७)पर्यंत चालणाºया या प्रदर्शनात नाशिककरांना नाण्यांचा एक अनोखा खजिनाच पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनात नाशिक, जुन्नर परिसरात सापडलेली सातवाहन काळातील कासे, लीड, चांदी व तांब्याची नाणी, गुलशनाबाद अर्थात नाशिकची चांदीची नाणी, पेशवे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, उदयपूरच्या राणाप्रताप चौहाण, बिकानेर, जयपूर, हैदरबाद व अहमदनगरच्या निजामाची नाणी, कच्छ राजाची नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, नोटा, पोर्तुगीज, डच काळातील विविध नाणी पहायला व विकत घ्यायला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रदर्शनात अहमद अझर शेख यांनी जमविलेल्या शिवराय कालीन नाण्यांचा मोठा संग्रह प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आला आहे. या संग्रहात शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पिढीतील शासकांची, त्या काळातील नाणी ठेवण्यात आली आहेत. तसेच अंमळनेर येथील पंकज दुसाने याने जमविलेल्या इतिहासकालीन शस्त्रात्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे. या शस्त्रास्त्रांमध्ये तलवार, ढाल, खंजीर, कुलूप आदिंचा खजिनाच पहायला मिळत आहे.नाणे, नोटांबरोबरच या नाण्यांविषयी सखोल माहिती देणारी पुस्तके, ग्रंथ, मासिके, सीडी, डिव्हीडी आदी येथे पहायला मिळत आहे.या तीन दिवसांच्या प्रदर्शनात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना इतिहास व छंदाची आवड निर्माण व्हावी या म्हणून काही नाणी व पोेस्टाची तिकिटे मोफत वाटण्यात येत आहे. इतिहासप्रेमी नाशिककरांनी बहुसंख्येने प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.सोन्याची मोहोरपौराणिक वा राजेरजवाड्यांच्या काळातील गोष्टी ऐकताना आपण ‘राजाने खूश होऊन इतक्या मोहोरा दिल्या’, ‘तितक्या मोहोरा चोरीस गेल्या’, गुप्तधनात अमुक इतक्या मोहोरा सापडल्या’ असे नेहेमी ऐकत आलो. अशा या गोष्टीतल्या सोन्याच्या मोहोरा या प्रदर्शनात पहायला मिळत आहे. शहरातील इतिहासप्रेमी संग्राहक विनयकुमार चुंबळे यांनी जवळपास लाखो रुपये किमतीची सोन्याची नाणी अर्थात मोहारा या प्रदर्शनात मांडून ठेवल्या आहेत. यात समुद्रगुप्त गुप्ता एम्पायर, ब्रिटिश इंडियाचे १८४१ साली काढलेले पहिले मोहोर नाणे, कुशान कनिष्कचे नाणे, ब्रिटिश इंडिया १८८१ सालचे मोहोर, दिल्लीच्या सुलतानाचे मोहोर नाणे असे असंख्य सोन्याचे नाणे अर्थात मोहोरा ठेवण्यात आल्या आहेत.दुर्मिळ नाणीवेस्टर्न छत्रप, मातीची पाणी, मुघल कालीन नाणी, शिवाजी महाराजांच्या राजवटीतील नाणी, टेराकोटा एरिकच नाणी, ब्राह्मी, पुलुमावी, सातवाहनराजा नाणी, वज्र-इंद्राच नाण, क्षत्रपकालीन नाणी, नहपन राजाचे नाणे अशी दुर्मिळ नाणी आहेत. याशिवाय पाच रुपयांची बेगम अख्तर, टाटा बिर्ला, मदर टेरेसा, संत अल्फोन्सा, भेल आदि विशिष्टकाळात आणि कमी प्रमाणात काढलेली नाणी येथे आहेत. ही नाणी ५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. या नाण्यांवर झाड, डोंगर, राजा महाराजांचे चित्र, त्यांचे लाडके प्राणी, पशु-पक्षी, तत्कालीन देवीदेवता, लोकजीवन, संस्कृती, त्यांच्या घराण्याचे चिन्ह पहायला मिळायचे.