शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मेशीसह परिसरात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:48 IST

मेशी : मेशीसह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी आणि सर्वच ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. मागील वर्षीचा भीषण दुष्काळ आणि या वर्षी एक महिन्याने लांबलेला पाऊस तसेच जोरदार पावसाची प्रतीक्षा यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : जेमतेम बरसलेल्या सरींवरच केल्या खरीप पेरण्या

मेशी : मेशीसह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी आणि सर्वच ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.मागील वर्षीचा भीषण दुष्काळ आणि या वर्षी एक महिन्याने लांबलेला पाऊस तसेच जोरदार पावसाची प्रतीक्षा यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. मागील आठवड्यात जेमतेम पाऊस झाला. परंतु जमीनीची भूक भागेल एवढा पाऊस नसतानाही खरीपाचे पेरणीचे कामे शेतकºाांनी सुरू केली आहेत. पाऊस येईल या आशेवर पेरणी तर झाली. मात्र पावसाने पुन्हा डोळे वटारले असून बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.सध्या केवळ ढगाळ वातावरण तयार झालेले दिसत आहे. परंतु मधेच जोरदार वारा सुरू होतो आणि वातावरण बिघडते, कधी अधून मधून कडक उन्हाचे चटके बसतात. महागडी बियाणांची खरेदी करून पेरणी केली जात आहे. परंतु असेच वातावरण राहिल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू नये यासाठी वरूणराजाला साकडे घातले जात आहे.उशिरा पेरणीने सर्वच आगामी समीकरणे बदलणार आहेत. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पिक कांदा आहे. या वर्षी पावसाळी कांदा लागवडीचे चित्र अद्याप धुसर होत आहे. कारण अद्यापही कांदा बियाणे (ऊळे) पेरणी झाली नाही. कमी पाऊस झाला म्हणून जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध नाही. यामुळे सगळ्यांचेच डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.