शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही एसटी बसेस दुरुस्तीचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:25 IST

एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. येथील बसेसचे शेड्युल मात्र काही प्रमाणात वाढविण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे.

नाशिक : एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. येथील बसेसचे शेड्युल मात्र काही प्रमाणात वाढविण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे. बसेसचे कमी केलेले शेड्युल आणि दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसेस तसेच चालक-वाहकावर लादण्यात येणारी बिनपगारी सुटी यामुळे संतप्त कर्मचाºयांनी मंगळवारी अचानक संप पुकारला होता. या संपानंतरही कामकाजात फारशी सुधारणा झाली नसल्याचे समजते. येथील वर्कशॉपमध्ये ५० पेक्षा अधिक बसेस या देखभाल दुरुस्तीसाठी उभ्या असल्याने बुधवारी येथील कामकाजासाठी टीआरपी सेक्शनमधील सात कर्मचाºयांना वर्कशॉप कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाठविण्यात आले आहे. मात्र या कर्मचाºयांना वर्कशॉप कामाबाबतची माहितीच नसल्याने या कर्मचाºयांची बदली निव्वळ औपचारिकच ठरली आहे. येथील बसेस दुरुस्तीबाबत फारसा फरक पडला नसल्याचे अधिकाºयांनी खासगीत सांगितले. मंगळवारपेक्षा बुधवारी मेन्टेनन्सच्या गाड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा करीत सुमारे १४० शेड्युल सुरू असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात डेपोत गाड्या उभ्या असून, नवीन मनुष्यबळ देऊनही फारसा फरक पडलेला नाही. खरेतर कमी मनुष्यबळामुळे बसेस दुरुस्तीच्या कामात मोठा अडथळा येत आहेच शिवाय गाडीचे सुटे भागही वेळेवर मिळत नसल्याने बसेस रस्त्यावर आणणे कठीण झाले आहे. असलेल्या मनुष्यबळात बरेचसे कर्मचारी हे सेवानिवृत्तीकडे झुकलेले आहेत. त्यामुळे कामावरही मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी वर्कशॉपमध्ये काम करू शकतील, असे तंत्रज्ञ तसेच अनुभवी कर्मचारी अपेक्षित आहे. मात्र येथे टायर प्लॅन्टचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. हे कर्मचारी येथे काय काम करणार असा सवाल डेपोतीलच अधिकाºयांना पडला आहे. खुद्द येथील अधिकाºयांनीदेखील याबाबतची नाराजी दर्शविली असून निव्वळ संख्या महत्त्वाची नाही तर कौशल्ययुक्त मनुष्यबळ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सुमारे ५० गाड्या या दुरुस्तीसाठी उभ्या होत्या. बुधवारी या गाड्यांची संख्या ३५ ते ४० झाल्याचे डेपोतून सांगण्यात आले. जे कुशल अकार्यक्षम कर्मचारी तेथे अतिरिक्त म्हणून पाठविले असेल तर मग रस्त्यावर आणलेल्या बसेसची खरेच दुरुस्ती झाली आहे का असा प्रश्न येथीलच कर्मचारी उपस्थित करीत आहेत.दोन बसेस उभ्यामंगळवारी पंचवटी डेपोत झालेल्या आंदोलनात कर्मचाºयांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या ठिकाणी गाड्यांचे सुटे भागच नसल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. एक बस तर निव्वळ आॅईलसाठी पंधरा दिवसांपासून उभी आहे. तर दुसरी बस महिन्यापासून उभी असताना कागदोपत्री मात्र तिला रुटवर दाखविले जात आहे. यातील सत्यतेविषयी कुणीही अधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नाही. मात्र याविषयीची चर्चा लपून राहिलेली नाही.अचानक बदल होतोच कसारात्री ड्यूटी संपून निघालेल्या कर्मचाºयाला उद्याची ड्यूटी कुठे आणि कोणत्या गाडीवर लागलेली आहे याची माहिती मिळते. परंतु सकाळी कामावर आल्यावर त्यांना गाडी आणि ड्यूटीच उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांना सक्तीने सुटी टाकण्यास सांगितले जाते. मात्र ऐनवेळी ड्यूटी आणि गाडी न देणे आणि बिनपगारी सुटी करण्यामागे प्रशासनाचा कर्मचारीविरोधी डाव असल्याचे बोलले जात आहे.