शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

छडा, समाधान आणि दिलासा !

By admin | Updated: January 20, 2017 01:16 IST

मंगळवार दि.१७ @ सरकारवाडा पोलीस ठाणे

विजय मोरे नाशिकजिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानके, जिल्हा रुग्णालय, महाविद्यालये, मल्हारखाण झोपडपट्टी परिसर अशी हद्द असलेले तसेच पोलीस आयुक्तालयाच्या प्रारंभापासून असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारचा (दि़१७) दिवस हा गुन्हेगारी घटनांसाठी दिलासा देणारा ठरला़ सकाळी अकरा ते पाच या वेळेत महिला सहायक पोलीस निरीक्षकांनी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा छडा लावण्याबरोबरच मैत्रेयच्या ठेवीदार महिलांना मार्गदर्शन करून दिलासा, तसेच मेळा बसस्थानकावरून महिलेच्या पर्समधून पैसे चोरणाऱ्या चोरट्यांचा तपास करण्यासाठी तत्परता दाखविल्याचे दिसून आले़४सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिवसभरात केवळ एक गुन्हा दाखल करण्यात आला़ रात्री नऊ वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आलेला हा गुन्हा सोमवारी (दि़१६) सायंकाळी त्र्यंबकरोडवरील हॉटेल ग्रीन व्ह्यू हॉटेलसमोर घडला होता़ अमोल हिरे (रा़ जयभवानी रोड, नाशिक) यांचे वडील दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली़ यामध्ये त्याच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुखापत झाली़ या प्रकरणी हिरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़दहीपुलावरील एका साडी विक्रेत्या दुकानदाराने तीन वर्षांपूर्वी एकास उधारीत साड्या दिल्या होत्या़ मात्र, तीन वर्षे होऊनही संबंधित ग्राहक साड्यांचे पैसे परत करीत नव्हता़ तसेच शिवीगाळ तसेच अ‍ॅट्रॉसिटीची धमकी देत असल्याने दुकानचालक संबंधित ग्राहकाविरोधात तक्रार करण्यासाठी वकिलांसह पोलीस ठाण्यात आले होते़ त्यानुसार त्यांचा अर्ज स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला़४सोमवारी (दि़१६) सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून गेलेली कॅनडा कॉर्नर परिसरातील अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही़ कुटुंबीयांनी चौकशी केल्यानंतर परिसरातीलच एका मुलासोबत गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून रात्री ९ वाजता अपहरणाची फिर्याद दिली़ यानंतर महिला सहायक पोलीस निरीक्षक एस. अहिरराव यांनी तपासाची सूत्रे फिरवून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली़ यासाठी संबंधित मुलाचा भाऊ तसेच मित्रास पोलीस खाक्याही दाखविला़ मात्र तपास न लागल्याने अहिरराव यांनी मंगळवारी सकाळपासूनच तपास सुरू केला़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलाच्या आईला सोबत घेऊन गेल्यानंतर सायंकाळी ५ वाजता अपहृत मुलगी व अपहरण करणाऱ्या मुलास पोलीस ठाण्यात हजर केले़ अवघ्या २० तासांत या दोघांचाही शोध घेतल्याने मुलीच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला़अपहृत मुलीच्या कुटुंबीयांनी सोडला सुटकेचा नि:श्वासशरणपूर रोडवरील सिआननगरमधील एक अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि़१६) सकाळी महाविद्यालयात गेली, मात्र घरी परतलीच नाही़ त्यामुळे अधिक तपास केल्यानंतर तिचे परिसरातीलच एकाने अपहरण केल्याची खात्री पटल्याने संबंधित युवकाविरुद्ध रात्री ९ वाजेच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ मंगळवारी सकाळी आठ वाजेपासूनच अपहृत मुलगी व अपहरणकर्त्या मुलाचे कुटुंबीय व नातेवाईक पोलीस ठाण्यात हजर झाले होते़ सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षकांनी तपासाची सूत्रे फिरवून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या दोघांनाही पाथर्डी फाटा परिसरातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले़ यामुळे भाड्यांत जीव पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना धीर आला़