शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनात सहभागी ट्रकचालकांचा टर्मिनलमध्ये मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:17 IST

डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमा हप्त्यात न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि न परवडणारी ई-वे बिल प्रणालीविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संपाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या आडगाव, चेहडी व विल्होळी येथील ट्रक टर्मिनलमध्ये हजारो मालवाहू वाहने उभी करण्यात आली आहेत.

नाशिक : डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमा हप्त्यात न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि न परवडणारी ई-वे बिल प्रणालीविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संपाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या आडगाव, चेहडी व विल्होळी येथील ट्रक टर्मिनलमध्ये हजारो मालवाहू वाहने उभी करण्यात आली आहेत. संपकाळात वाहनांचे व मालाचे नुकसान टाळण्यासाठी ट्रकचालकांनीही येथेच मुक्काम ठोकला आहे.  आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०) देशभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारांहून अधिक मालवाहतूक करण्याºया वाहणांची चाके थांबली आहे. जिल्हाभरातील १५०० हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी या संपात सहभाग घेतला आहे.व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्थामालवाहतूकदारांच्या संपामुळे ट्रकचालकांनी मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकचालकांसाठी नाशिकमधील विविध वाहतूकदार संघटनांतर्फे वाहनचालकांच्या भोजनाची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक