शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 02:54 IST

येवला : आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील येवला- कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम व येवला शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी किसान क्र ांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून शासनचा निषेध केला. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर झालेल्या आंदोलनात परिसरातील उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल या गावातील शेतकर्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु हा शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत होते. शेतकऱ्यांनी या संपात भाग घेऊन नये अशी दहशत बसविण्यासाठी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. सनदशीर मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागू नये अशी काळजी प्रशासनानेदेखील घेतली पाहिजे. शेतकर्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांची सुटका करण्याची मागणी किसान क्र ांती मोर्चाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, पं. स. सभापती संजय बनकर, मंगेश भगत, विठ्ठल आठशेरे, रूपचंद भागवत, बापू गायकवाड, वसंतराव पवार, बाळासाहेब लोखंडे, प्रकाश वाघ, कांतीलाल साळवे, भागवत सोनवणे, नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, प्रकाश वाघ, अर्जुन कोकाटे, अरु ण जाधव, अमोल फरताळे, दत्तू खिल्लारे, ज्ञानेश्वर दराडे, शिवाजी भालेराव, किरण ठाकरे, साईनाथ खोकले, नानासाहेब लभडे, सुदाम लभडे, विक्र म पवार, महेंद्र पगारे, भाऊसाहेब गरुड, देवीदास शेळके, अशोक मेंगाणे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.