शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती

By admin | Updated: August 15, 2014 01:01 IST

शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती

 

सिन्नर : राज्य आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत असले तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यातील केवळ अठरा टक्के जमीन सिंचनाखाली आहे, तर ८२ टक्के क्षेत्र जिरायती आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे असून, शेतकऱ्यांचा विकास झाला तरच राज्याची प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोमलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचा साखळी बंधारा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती राजेश नवाळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, सुकदेव बनकर, व्ही.सी. वखारे, सरपंच संजय बोऱ्हाडे, जे.एम. लिहीतकर, आनंद मोरे, शशिकांत मंगरुळे, अविनाश लोखंडे आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पाणीटंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात एक हजार ७०० बांध बांधण्यात आले असून, आता दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साखळी बंधाऱ्यांचा उपक्रम चांगला असून, त्यासाठी किमान पाऊस पडण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. टॅँकरची संख्या कमी करण्यासाठीच साखळी बंधाऱ्याचा उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब साठविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील ५७ टक्के जनता शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कांद्याच्या किमतीबाबत बोलताना ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सोबत आपण शेवटपर्यंत भांडत राहणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख कमी करून क्रांती घडवून आणण्यासाठी आपत्तीचा धाडसाने सामना करण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असे म्हणणे चुकीचे असून, केंद्राकडून राज्य शासनाने ११ हजार कोटी रुपये आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे जलसंधारणमंत्री राऊत यांनी सांगितले. दुष्काळमुक्त वातावरण निर्मितीला मुख्यमंत्र्यांची मदत झाल्याचे राऊत म्हणाले. टंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा जलसंधारण खात्याचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमदार कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वडांगळी व कीर्तांगळी येथे कोटा बंधाऱ्याचे, खोपडी येथे देवनदीवरील पूर कालव्याच्या कामाचे तर मुसळगाव येथे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. सुमारे ५७ कोटी रुपयांच्या निधीतून देवनदीवरून पूर्वभागासाठी करण्यात येणाऱ्या पूर कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भरपावसात अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, दिलीपराव शिंदे, राजेंद्र चव्हाणके, रामदास खुळे, राजेंद्र घुमरे, विजय काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)भावना व्यक्त केली.