शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

ठेकेदारीचा कर्मचाºयांना फटका राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय कंत्राटी पद्धतीने होणार काम एसटीतील सफाई कर्मचाºयांची पदे गोठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:31 IST

नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पदे गोठविण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे१५० कर्मचाºयांना आता इतर विभागांत ढकलले जाणार कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना

नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पदे गोठविण्यात आली आहेत. महामंडळाच्या स्वच्छता विभागाचे खासगीकरण करताना या विभागात काम करणाºयांची पदे गोठविण्यात आल्याने नाशिक विभागात काम करणाºया सुमारे १५० कर्मचाºयांना आता इतर विभागांत ढकलले जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळात सध्या वेतन करार तसेच एसटीला होणारा तोटा या भोवतीच संपूर्ण राजकारण फिरत आहे. त्यामुळे २० महिन्यांपासून वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरीकडे एसटीने तोटादेखील जाहीर केला आहे. असे असताना महामंडळात मात्र खासगीकरण आणि नूतनीकरणाबरोबरच खरेदी, पदभरतीच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले जात आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाºयांमध्येच संभ्रमावस्था असून, खासगीकरण आणि कंत्राटीकरण पुढे येत असल्याने कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व आगारांमधील बसची स्वच्छता तसेच सफाई कामांचे कंत्राटीकरण केलेले आहे. सुमारे ४५० कोटींचा हा करार करण्यात आल्याची चर्चा असून, नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १२५ कोटींचे कंत्राट देण्यात आल्याचे समजते. कंत्राटदाराला स्वच्छता कामासाठी त्याच्याकडील कर्मचारी नियुक्तीची परवानगी असल्याने खासगीकरणातून त्यांनी काही कर्मचारी कामावरही आणले आहेत. परंतु मूळ एसटीतील स्वच्छता आणि सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेली आणि रुजू होणाºया अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ही पदे आता एसटीच्या आस्थापनेवरून गोठविण्यात आली असल्याने अनुकंपावरील कर्मचाºयांच्या नियुक्तीचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. एसटीमध्ये पाच टक्के अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. ही बहुतांश नेमणूक स्वच्छता आणि स्वच्छक कर्मचाºयांच्या रूपात होत असते. कारण अनुकंपाधारक म्हणून बहुतांश महिला आणि मुले अल्पशिक्षित असतात. काहींचे वयदेखील अधिक असते. अशा कर्मचाºयांना एसटीतील इतर विभागांत काम देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले जाते. परंतु आता स्वच्छता कामाचे खासगीकरण झाल्याने आणि सफाई कर्मचारी, स्वच्छकाची पदे गोठविण्यात आल्यामुळे यापुढे या पदांवर कोणत्याही प्रकारची भरती होऊ शकणार नाही.कर्मचाºयांवर अन्यायराज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता कामाचे खासगीकरण केल्यामुळे अनेक कर्मचाºयांच्या रोेजगाराचा प्रश्न आहे. या कर्मचाºयांसाठी महामंडळानेच त्यांना ९० दिवसांचे ट्रेनिंग देऊन त्यांना कनिष्ठ सहायक म्हणून नोकरीची हमी दिली पाहिजे. स्वच्छतेची काही कामे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहेत. त्या कामावरही हक्काने काम मिळणार नसेल तर नाराजी नक्कीच पसरेल. ही पदे न गोठविता कर्मचाºयांना इतरत्र सामावून घेतले पाहिजे.