शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

महिला कर्णबधिरांची राज्यस्तरीय परिषद

By admin | Updated: August 25, 2015 23:44 IST

महिला कर्णबधिरांची राज्यस्तरीय परिषद

नाशिक : कर्णबधिर महिलांना सामाजिक सुरक्षा, स्थैर्य व आर्थिक स्वावलंबन प्राप्त व्हावे, यासाठी राज्यस्तरीय कर्णबधिर महिला सबलीकरण परिषद स्थापन होऊन त्यात विविध ठराव करण्यात आले. शासनाने कर्णबधिर कर्मचाऱ्यांना घोषित केलेला वाहनभत्ता देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी दिले. पंचवटीतील पलुस्कर सभागृहात आयोजित महाराष्ट्रातील कर्णबधिर महिला सबलीकरण परिषदेचे उद्घाटन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज सेलगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून रामदास चव्हाण, प्रकाश फडके, जयसिंग काळे, गोपाल बिरारे, सतीश गायकवाड हे होते. कर्णबधिर व्यक्तींना सामाजिक उत्तेजनाअभावी जगणे अशक्य झाले असल्याने त्यासाठी ही परिषद घेण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी हिंदीतून संवाद साधला व महिला मूकबधिरांचे प्रश्न, अडचणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करू व वाहनभत्ता देण्याचा निर्णय काढेपर्यंत सरकार दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. कर्णबधिर महिलांनी एकत्र येऊन आपल्या व्यथा मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्ष सेलगावकर यांनी केले. याप्रसंगी कविता काळे, ज्योती फडके, रेणू आहुजा, प्राजक्ता कुलकर्णी, पूजा कर्णिक, अनिता गायकवाड, मृणाल बाविस्कर, शिवलीला चौघुले, तस्लीम शेख, प्रियंका चव्हाण आदि उपस्थित होत्या. आमदार भुजबळ यांच्या हिंदीतील भाषणाचे मूक-कर्णबधिर खुणानुसार दुभाषक तस्लीम शेख यांनी करून दिले. (प्रतिनिधी)