शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून कांदा लिलाव होणार सुरू

By admin | Updated: July 25, 2016 23:06 IST

गोणी मार्केटची मागणी : शेतकऱ्यांची नाराजी

नाशिक : कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.२५) लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा-बटाटा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी अहमदनगर-राहुरीच्या धर्तीवर गोणीत भरून आणलेल्या कांदा व बटाट्याचा लिलाव करण्याची अट टाकल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आधीपासूनच कांदा व बटाट्याची गोणी भरून खरेदी-विक्रीचे लिलाव होत आहेत. मात्र लासलगाव, पिंपळगाव या कांदा खरेदी- विक्रीच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नवीन परवाने देण्याबाबत जाहिरात दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी नमते घेतल्याची चर्चा होती. सोमवारपासून कांदा व बटाटे व्यापाऱ्यांनी परवाने परत घेण्यास सुरुवात केल्याने मंगळवारपासून कांदा व बटाटा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या व्यापाऱ्यांनी अहमदनगर व राहुरीप्रमाणे गोणीमार्केट सुरू करण्याची अट टाकली आहे. त्यानुसार बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना गोणीत भरून माल आणण्याचे आवाहन केले आहे. मात्र गोणी आणि गोणीत भरण्याची हमाली असा सरासरी क्विंटलमागे ७० ते ८० रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी येणार असल्याने शेतकऱ्यांनी या गोणीमार्केटला विरोध केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून होणाऱ्या कांदा-बटाटे विक्री व्यवहाराकडे सहकार विभागाचे लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)