शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळाचे देखावे साकारण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:30 IST

परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखावे, आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

नाशिकरोड : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखावे, आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.  मनपा व पोलीस प्रशासनाने जाचक अटींची कठोर अंमलबजावणी केल्याने लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या परिश्रमाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळाल्याने मंडप व उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, तर काही छोट्या-मोठ्या मंडळांचे मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून, देखावे साकारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने स्वच्छता, साफसफाई करण्याचे काम गृहिणी वर्गाकडून केले जात आहे. जेलरोड येथे श्री गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा येतो म्हणून शहर वाहतूक शाखेने व गाळ्या मागील जागा मालकाने हरकत घेतली होती. मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलधारकांनी जाचक अटीमुळे मनपाच्या लिलावात भाग न घेता स्वत:च्या खासगी जागेत, मोटवानीरोड येथील पाटीदार भवन व शिखरेवाडी येथील मोकळ्या खासगी जागेत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यंदा जेलरोडला गणपती विक्रीचे स्टॉल नसल्याने भाविकांची माहिती नसल्याने गैरसोय होत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरात व सोसायटी, कॉलनीत छोट्या मंडळाच्या देखाव्यासाठी विविध शोभीवंत वस्तू, लायटिंग आदी विक्रीस दाखल झाले आहे. तसेच ठिकठिकाणी सीडी विक्रीच्या दुकानात श्री गणरायाची गाणे लावली जात असल्याने भक्तिमय वातावरणास सुरूवात झाली आहे.मनपाची नवीन सक्तीमनपाच्या जाचक अटीमुळे गणेशोत्सव मंडपाची परवानगी घेता घेता कार्यकर्त्यांना नाकीनव आले होते. आता मनपा प्रशासनाकडून परवानगी दाखला व शुल्क भरल्याची पावती देण्यात येत असून, मंडळाने त्याचेही डिजिटल प्रिंटिंग करून मंडपाच्या दर्शनी बाजूस लावण्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती