शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवक जोडो अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:39 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जोडो अभियानास नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून, कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटबाजीचे उघड दर्शन घडून या गटबाजीच्या दर्शनातून झालेले स्वागत तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

कळवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जोडो अभियानास नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून, कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटबाजीचे उघड दर्शन घडून या गटबाजीच्या दर्शनातून झालेले स्वागत तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.राज्यभरात पाच हजार युवकांच्या शाखा उघडण्याबरोबरच पुढील तीन महिन्यात पक्षाला दोन लाख नवीन युवक जोडण्याचा संकल्प असून, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामांचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कळवण येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबरोबर युवक जोडण्याचा संकल्प करणारे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे मात्र कळवण तालुक्यात स्वागताऐवजी गटबाजीच्या आलेल्या अनुभवातून चांगलेच नाराज झाले. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने युवक जोडो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात कळवण शहर व तालुक्यात शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन रायुकॉँ प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. केंद्र व राज्यात सत्तारूढ भाजपा- शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रचंड मोठी आंदोलने होऊनदेखील युती सरकारने अजूनही याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत.जिल्ह्यातदेखील १ जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत ९६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर उदासीन असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी यावेळी बोलताना केली.युवक जोडो अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज होत असून, दुसरा टप्पा लवकरच सुरू करणार आहे. यात ५०० शाखा उघडण्याचा मानस असल्याचे सांगून युवक संघटना ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची फायटिंग ब्रिगेड असल्याने युवक कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आगामी काळात पक्षाला मोठ्या प्रमाणावर युवक जोडून रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलने करावीत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले आहे. यावेळी कळवण शहरात संभाजीनगर, गावठाण, एसटी बसस्थानक, मेनरोड, निवाणे, बालापूर, गोपाळखडी, हिंगवे, वाडी, एकलहरे येथील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी मान्यवर उपस्थित होते.