शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ स्लॅबच्या कामास सुरुवात

By admin | Updated: November 29, 2015 23:05 IST

देवळा : जलवाहिनीत प्राणी आढळला नसल्याचा दावा

देवळा : देवळा सामुदायिक पाणीपुरवठा विभागाच्या सरस्वतीवाडी येथील जलकुंभातून शनिवारी बोकडसदृश प्राणी वितरण व्यवस्थेच्या जलवाहिनीत वाहून आल्यानंतर संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन रविवारी जलकुंभाच्या कोसळलेल्या स्लॅबच्या कामास सुरुवात केली.परंतु जलवाहिनीत अडकलेला प्राणी काढण्यासाठी गॅसकटरने पाईपलाईन कट केल्यानंतर त्या ठिकाणी प्राणी आढळून आला नाही. पाण्याच्या दाबामुळे सदर प्राणी अथवा त्याचे अवशेष पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेले असावेत. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दहा महिन्यांपूर्वी देवळा सामुदायिक नऊ गाव पाणी पुरवठा योजनेचा सरस्वतीवाडी येथील जलकुंभाचा (क्षमता ४ लाख ५० हजार लिटर) स्लॅबचा बरचसा भाग कोसळला होता. यामुळे सदरची योजना धोक्यात आली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थानी त्याा पाठपुरावा केला. भविष्यात येणाऱ्या धोक्याच्या सुचना देखील जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांचेकडे केल्या होत्या. परंतु ह्या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत समन्वय नसल्याने स्लॅब दुरुस्तीचे काम रखडले होते. त्यावेळी योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासने देऊन वेळ निभाऊन नेली. जि.प.चे कृषी सभापती केदा आहेर व समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी जिल्हापरिषदेत वेळोवेळी जलकुंभाच्या स्लॅब दुरुस्तीचा प्रश्न मांडला व त्या कामास मंजुरी मिळवली. मात्र ह्या कामासाठी ठेकेदाराची नेमणुक न झाल्याने काम रेंगाळले होते.१९७२ साली निर्माण करण्यात आलेली ही पाणी पुरवठा योजना जीर्ण झाली आहे. सरस्वतीवाडी येथील जलकुंभ स्लॅब कोसळल्याने उघडा झाला आहे. त्याला कोणतेही संरक्षण नाही. जलकुंभापर्यंत कोणीही सहज जाऊ शकते. असलेल्या पायऱ्यांचे बांधकाम ढासळून गेले आहे. याठिकाणी पथदीप सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अंधार असतो. जलकुंभाशेजारी असलेल्या झाडांवर १० ते १५ धोकादायक असलेल्या भदुर मधाची पोळी आहेत.परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे. योजनेची जबाबदारी असलेला अधिकारी मुख्यालयी राहात नाही. अनेक अडचणींना तोंड देत स्थानिक पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या जीवावर हि योजना कशीबशी तग धरुन आहे. (वार्ताहर)नागरिकांकडून स्वागतलोहोणेर येथून जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे पाणी जलकुंभाच्या स्लॅब दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने त्यात टाकता येणार नाही. पाईपलाईन बायपास करुन जलकुंभाच्या वितरीकांना जोडून नऊ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. स्लॅबचे काम त्वरीत सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.