शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

कामे सुरू करा, निधी मिळेल! सिंहस्थ कुंभमेळा : शासकीय खात्यांना पत्र

By admin | Updated: May 8, 2014 21:31 IST

नाशिक : गेल्या वर्षभरापासून निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत चालढकल करणार्‍या संबंधित खात्यांना आता कामे सुरू करा, निधी मिळवा असे म्हणावे लागत असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांनी थेट खात्यांना पत्र पाठवून स्मरण करून दिले आहे.

नाशिक : गेल्या वर्षभरापासून निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत चालढकल करणार्‍या संबंधित खात्यांना आता कामे सुरू करा, निधी मिळवा असे म्हणावे लागत असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांनी थेट खात्यांना पत्र पाठवून स्मरण करून दिले आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने ४२३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, त्यात एकट्या महापालिकेला २१८ कोटी रुपये, त्र्यंबक नगरपालिकेला ३२ कोटी रुपये दिले, तर रेल्वेलाही पाच कोटी वर्ग करण्यात आले आहेत. जवळपास १६८ कोटी रुपये कुंभमेळ्याच्या पीएलए खात्यांवर जमा आहेत. परंतु आजवर पैसे नसल्याच्या कारणावरून सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेला असताना कामे सुरू करण्यास विविध खात्यांनी अनुत्सुकता दर्शविली होती. या खात्यांकडे तगादा लावूनही निधीची तरतूद नसल्याने कामे सुरू करता येणार नाही, असा एकच धोशा त्यांनी लावला. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना राज्याच्या मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही निधी उपलब्धतेच्या विषयावर चर्चा झाली. पण कुंभमेळ्याशी निगडित कामे सुचविताना संबंधित विभागांनी कामांची निकड व गरज याची सांगड योग्य प्रकारे न घातल्याने निधी देण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद करतानाच, संबंधित खात्यांच्या बजेटमध्येही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी राखून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिणामी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेरीस ४२३ कोटी रुपये जिल्‘ाला प्राप्त झाले आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्वच विभागांच्या कामांना त्याचा फटका बसला. विशेष करून दीर्घ मुदतीची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी किमान दीड-दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यातही पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने तर ही कामे कुंभेळ्याआधी पूर्ण होतील किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात विभागीय आयुक्तांनी सर्वच खात्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहिता शिथिल होताच, कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु तरीही काही खात्यांची कूर्मगती सुरू आहे. एरव्ही निधी नसल्याने कामे नाकारणार्‍या खात्यांनी आता निधी उपलब्ध असूनही चालढकल चालविल्याने त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी थेट लिखित स्वरूपात पत्रेच पाठविण्यात आली आहेत. कामांची निविदा व प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश दाखविल्यास तत्काळ निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.