शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
3
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
4
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
5
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
6
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
7
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
8
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
9
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
10
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
11
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
12
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
13
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
14
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
15
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
16
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
17
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
18
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
19
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
20
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?

नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात

By admin | Updated: August 20, 2014 00:44 IST

समाधान : वाहतूक कोंडी फुटणार

उपनगर : नाशिक-पुणे महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र मागे घडले त्याप्रमाणे काम सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाशिक-पुणे महामार्ग वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने गेल्या काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचा विषय चर्चिला जात आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले होते. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस पूर्वी रस्ता खरडून रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र लागलीच ते कामदेखील बंद पडले होते. कुंभमेळा वर्षभरावर येऊन ठेपला असून, सध्या पावसानेदेखील विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सदर रस्ता रुंदीकरणाला मंजुरी मिळाली असून, जागा ताब्यात घेण्याची कारवाईदेखील झालेली आहे. दुकानांच्या संरक्षक भिंती मागे घेण्यात आलेल्या आहेत. तसेच जी झाडे रुंदीकरणात अडथळा ठरत आहेत, त्यावर मार्किंगदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी सदर रस्त्याचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)