शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 01:09 IST

देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी येथील श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आयोजित वारकरी महोत्सवास रविवारपासून (ता.३) सुरुवात झाली. श्री गोरक्षनाथांच्या महापूजेने या उत्सवाचा प्रारंभ झाला.

ठळक मुद्देमकरंदवाडीत धर्मबीज उत्सव : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी येथील श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आयोजित वारकरी महोत्सवास रविवारपासून (ता.३) सुरुवात झाली. श्री गोरक्षनाथांच्या महापूजेने या उत्सवाचा प्रारंभ झाला.महोत्सवात नवनाथ ग्रंथ व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण हे एकनाथ महाराज कोष्टी यांच्या नेतृत्वात सुरू असून, रोज दुपारी बंडा महाराज कराडकर हे श्रीमद्भागवत ग्रंथातील भरतगीता यावर प्रवचन देत आहेत. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हसेगावकर यांचे कीर्तन झाले. तात्कालिक प्रभाव, आत्यंतिक प्रभाव, भावनिक सौंदर्य, वस्तुनिष्ठ सौंदर्य यावर महाराजांनी सोप्या भाषेत चिंतन केले.दरम्यान श्रीगोरोबाकाका महाराज संस्थान तेर येथील २०० वारकरी विद्यार्थी हरिपाठासह कीर्तनाला साथ देत आहेत. कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने येथे होत असून सोमवारी बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन झाले.याशिवाय, रोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. महोत्सवात शनिवार, दि. ९ रोजी संतपूजन सोहळा होणार असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवृंद, पखवाजवादक, टाळकरी, वारकरी यांच्यासह भाविकांची मोठी उपस्थिती हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे. कार्यक्रमस्थळी भव्य मंडप व रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञान-भक्तीचा संगम आहे. समाजाला सन्मार्गावर आणण्याचे पवित्र कार्य या वारकरी महोत्सवातून होत आहे. येथे भाविकांच्या भक्तीचा मळा फुलला आहे. भाविकांनी या महोत्सवातील सर्वच कार्यक्र मांचा लाभ घ्यावा.- संजय धोंडगे,अध्यक्ष, निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर