शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. ...

नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. प्राप्त लसींमध्ये ३२ हजार ७०० लसी या कोविशिल्डच्या असून, ९ हजार १०० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत.

जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याच्या निर्धारित लसीकरणाच्या तुलनेत ९० टक्क्यांच्या आसपास लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठी या लसी दाखल झाल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने कोविशिल्डच्या लसींचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या टप्प्यात आलेली लस ही कोव्हॅक्सिनचीच आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा लस घेणाऱ्या व्यक्तींना त्याच कोविशिल्डच्या लसी दिल्या जाणार आहेत. मात्र, नवीन लस घेणाऱ्यांना कोव्हॅक्सीनच्या लसी देण्यात येत आहेत. लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस, विविध क्षेत्रांतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांनादेखील या लस दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रासाठी आलेल्या स्टॉकमधून नाशिक जिल्ह्याला ४३ हजार ४४० लसी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, आता त्या तुलनेत सुमारे दीड हजार कमी लस प्राप्त झाल्या आहेत.

इन्फो

तालुकास्तरावर लसींचे वितरण

जिल्हा रुग्णालयातील लस साठवणूक दालनातील वॉक इन कुलरमध्ये सुमारे ५ डिग्री सेंटिग्रेडला या लसी मोठ्या बॉक्सेसमध्ये साठवून ठेवण्यात आल्या आहेत. त्या लसींचे तापमान कायमस्वरूपी २ ते ८ डिग्रीपर्यंत ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य केंद्रांमध्ये व्हॅनमधून नेतानाही त्या लसी आइसलँड रेफ्रीजरेटरमधून (आयएलआर) नेण्यात आल्या असून जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांपर्यंत त्या पोहोचविण्यात आल्या आहेत.