शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:31 IST

निफाड : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदार याद्या अद्यावत करणे, नवमतदारांची नोंदणी करणे यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

ठळक मुद्देनवमतदारांची नोंदणी : प्रभावी अंमलबजावणीसाठी निफाडला बैठक

निफाड : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदार याद्या अद्यावत करणे, नवमतदारांची नोंदणी करणे यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.त्या निमित्ताने दिंडोरी लोकसभाअंतर्गत निफाड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी महेशपाटील यांनी त्यांच्या दालनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सर्कल आॅफिसर यांची बैठक घेतली. याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या काळात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे वगळणे, नाव दुरु स्त करणे, नाव स्थलांतरित करणे यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले.आतापर्यंत चांदोरी, सायखेडा, पिंपळगाव या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसमोर मतदार पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे भाजपाचे जिल्हा चिटणीस शंकर वाघ, पंढरीनाथ थोरे, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, विस्तारक संजय गाजरे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र बोरगुडे, दिलीप कापसे, रिपाइंचे भरत खडताळे, आपचे तालुकाध्यक्ष उत्तम निरभवणे, मनसे उपजिल्हाध्यक्ष धर्मेश जाधव, सुरेश देवकर, संतोष पगारे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.मतदार नोंदणीस सहकार्य करावेनिफाड मतदारसंघात एकूण २७१ बीएलओ आहेत. त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम सुरू आहे. ते घरोघरी मतदार नोंदणीसाठी येतील तेव्हा नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. मतदार यादीमध्ये काही चुका असतील तर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बीएलओंना सांगावे व या कार्यक्रमात आपला सहभाग द्यावा, दुबार मतदार नोंदणीची चौकशी करताना सहकार्य करावे, असे आवाहन करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीने एक गठ्ठा मतदार नोंदणी अर्ज देऊ नयेत ते स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.