शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याच्या कामांना प्रारंभ

By admin | Updated: June 1, 2014 00:46 IST

येवला : येवला विधानसभा मतदारसंघातील मांजरपाडा प्रकल्पअंतर्गत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या पूर्णत्वासाठी ७० कोटी रुपये उपलब्ध झाल्यामुळे निधीअभावी बंद असलेली बोगद्याची कामे सुरू होतील. तसेच वर्षअखेर ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

येवला : येवला विधानसभा मतदारसंघातील मांजरपाडा प्रकल्पअंतर्गत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या पूर्णत्वासाठी ७० कोटी रुपये उपलब्ध झाल्यामुळे निधीअभावी बंद असलेली बोगद्याची कामे सुरू होतील. तसेच वर्षअखेर ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.निधी उपलब्धतेमुळे ८.८६ कि.मी. पैकी १२६0 मी. बोगद्याचे काम पूर्ण होते शक्य होणार आहे, तसेच पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधीत विभागास ना. भुजबळांनी आदेश दिले.सुरगाणा तालुक्यातील केम पर्वताच्या पायथ्याशी पार नदीवर २६२ मीटर लांबीचा ३८ मीटर उंच स्पिल वे चे काम प्रगतिपथावर आहे. १३ वळण बंधारे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या वळण बंधार्‍यामुळे अडवलेले ६0६ द.ल.घ.फू. पाणी ८.९६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात टाकून या कालव्याद्वारे दरसवाडी प्रकल्पातून डोंगरगाव मध्य प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या योजनेतून ९० कि.मी. लांबीच्या पोहोच कालव्याद्वारे चांदवड तालुक्यातील ५ व येवला तालुक्यातील ३५ पाझरतलाव व २ लघुपाटबंधारे तलाव पाण्याने भरून देण्याचे या योजनेचे प्रयोजन आहे. या योजनेमुळे मतदारसंघातील उत्तर-पूर्व परिसरातील सर्व गाव सिंचनाखाली येणार असून, शेतीबरोबरच, पिण्याचाही प्रश्न निकाली निघणार आहे.येथील संपर्क कार्यालयात कामाचा आढावा भुजबळ यांनी घेतला. ॲड. माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष नीलेश पटेल, नगरसेवक मनोहर जावळे, हुसेन शेख, राधाकिसन सोनवणे, पंकज पारख आदिंनी विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. सायगाव, महालखेडा भागातील रेंगाळलेल्या कामासंबंधाने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. उत्तर पूर्व भागाचे साकरचंद साळवे यांनी या भागातील न झालेल्या कामांची यादी वाचली.अहल्याबाई होळकर जयंतीपालकमंत्री छगन भुजबळ यांनी अंगणगाव येथील अहल्याबाई घाटावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी डॉ. सुधीर जाधव, ॲड. माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, साकरचंद साळवे, अरुण थोरात, वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालिकेचे गार्‍हाणे घातलेपालिकेत सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यमान कर्मचारी यांचेत चालू असलेली सुंदोपसुदी व त्यातून कामबंद आंदोलन या संदर्भाने नगरसेवक मनोहर जावळे यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली.