शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमद्भागवत संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:52 IST

पाटोदा : आई-वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, आईवडिलांची सेवा केल्याने भगवंत प्राप्ती होते म्हणून मनुष्य जीवनात प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी.

ठळक मुद्देआईवडील लेकराचे हित जपतातउपकार फिटणार नाही

पाटोदा : आई-वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, आईवडिलांची सेवा केल्याने भगवंत प्राप्ती होते म्हणून मनुष्य जीवनात प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, असे आवाहन वेदांताचार्य ह.भ.प. प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता.येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेप्रसंगी केले. प्रत्येक आईवडील हे आपल्या लेकराचे हित जपत असतात तसेच कोणत्याही लाभाशिवाय आपल्या मुलावर प्रेम करतात. किती ही कष्ट झाले तरी ते आपल्या लेकरांसाठी सहन करतात म्हणून मुलानेआपल्या चामड्याची चप्पल जरी आईवडिलांना दिली तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत, असेही ते शेवटी म्हणाले. सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, सायंकाळी हरिपाठ, गीता पारायण, रात्री श्रीमद्भागवत कथा या प्रकारे कार्यक्र म होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमास प.पू. सद्गुरू विश्वनाथ महाराज, सहकार नेते अंबादास बनकर, विठ्ठलराव शेलार, अंबादास महाराज जगताप, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, शिवाजी महाराज गायके, सूर्यभान नाईकवाडे, बाळासाहेब पिंपरकर, बाबूशेठ कासलीवाल, भास्कर येवले, राजाभाऊ घोडके, ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणिस रवींद्र शेलार, सरपंच रघुनाथ शिंदे, श्रीकृष्णा गरुडे, उपसरपंच नारायण गुंजाळ, फकिरा निकम, चेअरमन बाजीराव जगताप, निवृत्ती ठोंबरे, पांडुरंग गायके, मोहन महाले, भास्कर शिंदे, अमृता शिंदे आदी मान्यवर व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेचे आयोजन पुढील सात दिवस असणार असून, शेवटी सोमवारी (दि. १९) स. १० ह.भ.प. शिवाजी महाराज तळेकर (भालूर) यांचे काल्याचे कीर्तन होईल़