शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोग्रस ते नाशिक पायी मोर्चास प्रारंभ

By admin | Updated: August 2, 2016 01:02 IST

सोग्रस ते नाशिक पायी मोर्चास प्रारंभ

आंदोलन : महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचारी संघटनासोग्रस : महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग -३ व वर्ग -४ कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोग्रस ते नाशिक येथील अदिवासी विकास विभाग कार्यालयापर्यंत हजारो मोर्चाकऱ्यांनी आज पायी मोर्चा आंदोलनास सुरुवात केली. संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी सोग्रस येथील मोर्चकरांच्या जाहीर सभेत सर्व आश्रमशाळेतील रोजंदारी, तासिका, कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अदिवासी विकास विभागाअंतर्गत सुरू असलेल्या वर्ग -३ वर्ग ४ ची भरतीप्रक्रिया तत्काळ बंद करावी, तासिका व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत भरती व बदलीप्रक्रिया कोणत्याही विभागात राबवू नये, रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांची सेवा सुरक्षित करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रितेश ठाकूर यांनी दिली. दरम्यान, सोमवारी दुपारी २ वाजता अदिवासी विकास विभाग नाशिकचे सहआयुक्त पानमंड व गायकवाड यांनी मोर्चेकरांची भेट घेतली. मागण्याविषयी मंत्रिमहोदयासमवेत तारीख घेऊन चर्चेची तयारी दर्शवली. आश्वासने देऊन बोळवण केली जाते, प्रमुख मागण्यांविषयी काहीही कार्यवाही होत नाही. सोग्रस (ता. चांदवड) ते नाशिक आदिवासी विकास भवनात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. नाशिक येथील आत्मदहन आंदोलनास नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे, गडचिरोली, चंद्रपूर, डहाणू, धारणी, नाशिक आदि जिल्ह्यांतील प्रतिनिधी, कर्मचारी, महिला, पुरुष सामील झाले आहे. (वार्ताहर)