शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात भात कापणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:10 IST

पेठ : नाशिक जिल्हयाचे पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यातील जनतेला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असून अनियमीत व वेळेपूर्वीच पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामाची पुरती वाट लागली असून भात व नागलीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळसदृष्य : अनियमीत पावसाने उत्पादनात घट

पेठ : नाशिक जिल्हयाचे पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यातील जनतेला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असून अनियमीत व वेळेपूर्वीच पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामाची पुरती वाट लागली असून भात व नागलीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.पेठ तालुक्यात यावर्षी सुरुवातीच्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र नंतरच्या काळात पावसाने ओढ दिल्याने ऐन पिकभरणीच्या काळात भात, नागली सह वरई, खुरासणी, ऊडीद या पिकांवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश: चारा गोळा करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकाच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा खर्चही वसूल होणार नसल्याने आदिवासी शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे.स्थलांतराचे प्रमाण वाढले...खरीप हंगामाचे पिक हातचे गेल्याने टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी शेतकरी व शेतमजूर यांनी तालुक्याबाहेर स्थलांतर केले आहे. जिल्हयातील निफाड, पिंपळगाव, ओझर, नाशिक, मातोरी आदी भागात रोजगारानिमित्त कुटूंबासह स्थलांतर केल्याने नाव-पाडे ओस पडू लागली आहेत. पेठ व हरसूल भागातील शेतमजूर दररोज गिरणारे व उमराळे या ठिकाणी मजूरांचे अड्डे सुरू झाले आहेत. जवळपास ३० ते ५० किमी खाजगी वाहनातून प्रवास करून रोजगार शोधतांना शेतमजूर दिसून येत आहेत.