शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:27 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील व परिसरातील बंधारे व पाझर तलावातील लोक सहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही फेब्रुवारीनंतर लगेचच शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.

ठळक मुद्देदेशवंडी : बंधाºयांची वाढणार खोलीग्रामस्थांनी सहभाग वाढविण्याची गरज

देशवंडी येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करताना सामाजिक कार्यकर्ते शरद कापडी. समवेत रमेश डोमाडे, बाळासाहेब कापसे, केशव कापडी, अशोक डोमाडे, ज्ञानेश्वर नागरे, मुरलीधर बर्केआदी.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील व परिसरातील बंधारे व पाझर तलावातील लोक सहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही फेब्रुवारीनंतर लगेचच शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गाव परिसरातील सर्व छोटे-मोठे बंधारे व पाझर तलावांतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि. १४) गोदा युनियनचे उपाध्यक्ष रमेश डोमाडे व सरपंच विनता कापडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी उपसरपंच सुभाष बर्के, ग्रामपंचायत सदस्य केशव कापडी, शरद कापडी, मुरलीधर बर्के, बाळासाहेब कापसे, अशोक डोमाडे, नवनाथ बर्के, रघुनाथ डोमाडे, ज्ञानेश्वर नागरे, हरी बर्के,शरद डोमाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. देशवंडी शिवारातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने गाव व शिवाराला अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोकसहभागातून होत असलेल्या गाळ काढण्याच्या कामाने सर्वच बंधाºयांची खोली वाढणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याबरोबर साचणाºया गाळामुळे सर्वच बंधाºयांची साठवण क्षमता कमी झाल्याने गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या कामामुळे पाणी साठवण वाढण्यास मदत होईल.- रमेश डोमाडे,उपाध्यक्ष गोदा युनियनलोकसहभागातून होत असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे सर्वच शेतकºयांचा फायदा होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी सहभाग वाढविण्याची गरज आहे.- विनता कापडी, सरपंच, देशवंडी.