शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नमामि गोदा’च्या जनप्रबोधन वारीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:19 IST

गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, याअंतर्गत ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदाजलचे कलश घेऊन गोदा प्रदूषणमुक्तीच्या जनजागृतीपर वारीला रविवारी ब्रह्मगिरी पर्वतापासून (दि.२०) प्रारंभ करण्यात आला.

नाशिक : गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, याअंतर्गत ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदाजलचे कलश घेऊन गोदा प्रदूषणमुक्तीच्या जनजागृतीपर वारीला रविवारी ब्रह्मगिरी पर्वतापासून (दि.२०) प्रारंभ करण्यात आला. त्र्यंबकेश्वरमधून उगम पावणाºया गोदावरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनातर्फे फ ारसे प्रयत्न होत नाही. त्यामुळे जनप्रबोधनासाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ स्थापन केले गेले आहे. सकाळी भर पावसात त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत अभिनेता चिन्मय उद््गीरकर, धनश्री क्षीरसागर, पूर्वा सावजी यांनी सर करत गोदेच्या उगमस्थानावरून गोदाजलाचे कलश भरून खाली आणले. तेथून कुशावर्तावर येऊन गोदा जल आणि गोदावरीच्या मूर्तीची विधीवत पूजन करण्यात आले. येथे वारीचे स्वागत शासनाच्या वतीने तहसीलदार महेंद्र पवार यांनी शासनाच्या वतीने केले.‘नमामि’चे अध्यक्ष गोदाप्रेमी राजेश पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघालेली वारी चक्रतीर्थ येथे पोहचली. तेथे गावकºयांनी स्वागत केले. तसेच स्वामी सोमेश्वरानंद यांच्या आश्रमात वारी पोहचली. येथे स्वामींनी वारीचे स्वागत केले. महिरावणी येथे वारी दाखल झाल्यानंतर तेथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावकºयांनी स्वागत केले. गोदाजल कलशाचे पूजन सुवासिनींकडून करण्यात आले. महिरावणीच्या ग्रामस्थांनीही गोदा प्रदूषणमुक्तीसाठी वचन ‘नमामि’ सोबत घेतले. अ‍ॅड शिरिष दंदणे, रोहन देशपांडे, किरण भालेराव आदिंसह सदस्य, स्वयंसेवक सहभागी झाले होते.‘सोमेश्वर’ होणार प्लॅस्टिकमुक्तगोदा प्रदूषणासाठी सोमेश्वर मंदिर विश्वस्त मंडळानेही ‘नमामि गोदा फाउंडेशन’च्या गोदा सन्मान अभियानात सहभागी होत सोमेश्वर मंदिर परिसर पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला. भाविक, विक्रेत्यांना कॅरिबॅगचा वापर मंदिराच्या आवारात क रू दिला जाणार नसल्याचे आश्वासन विश्वस्तांनी ‘नमामि फाउंडेशन’ला दिले. जनप्रबोधन वारी मंदिरात मुक्कामी होती. सोमवारी (दि.२१) सकाळी वारी रामकुंडाच्या दिशेने मार्गस्थ होईल.