शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या प्रकल्पातून दररोज ५ टन ऑक्सिजनच्या निर्मितीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

नाशिक : ऑक्सिजनच्या सातत्यपूर्ण तुटवड्याने ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात अनेक नागरिकांचा तडफडून मृत्यू होऊ लागला असताना नाशिकमध्ये ...

नाशिक : ऑक्सिजनच्या सातत्यपूर्ण तुटवड्याने ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात अनेक नागरिकांचा तडफडून मृत्यू होऊ लागला असताना नाशिकमध्ये ५ टन ऑक्सिजनची दररोज निर्मिती करणाऱ्या स्वस्तिक एअर सर्व्हिस प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनच्या उपलब्धतेला काहीसा हातभार लागू शकणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनची उपलब्धता हीच सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीमुळे कोणत्याही स्थितीत जिथून ऑक्सिजन मिळेल, तिथून उपलब्ध करून घेण्याचे धोरण शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाने विविध कारणांमुळे बंद पडलेले ऑक्सिजनचे काही प्रकल्प पुन्हा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. दरम्यान, नाशिकच्या शिंदे टोलनाक्याजवळ असलेला स्वस्तिक एअर सर्व्हिसेस ही कंपनी वीज बिल थकबाकीसह काही अन्य तांत्रिक कारणांमुळे प्रदीर्घ काळापासून बंद होती. त्याबाबतची माहिती मिळताच काही स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन ही कंपनी सुरू करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले. त्यानंतर मागील थकबाकीची बाब तशीच प्रलंबित ठेवून सध्या ही कंपनी पुन्हा सुरू करण्यास संमती मिळाली. त्यामुळे नाशिकच्या ऑक्सिजनच्या तुटवड्यात किमान काही प्रमाणात घट येऊ शकणार आहे. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी १२५ टनहून अधिक आहे. मात्र, प्रत्यक्षात ऑक्सिजनचा पुरवठा मात्र ८० टनांच्या आसपासच होत असल्याने हा तुटवडा खासगी रुग्णालयांतील रुग्णांसह गंभीर रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील बंद पडलेले अन्य काही ऑक्सिजन प्रकल्प याप्रकारे सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

इन्फो

७ किलोचे ७०० सिलिंडरची दररोज निर्मिती

नाशिकच्या या प्रकल्पातून एकूण सुमारे ५ टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे साधारणपणे दररोज ७ किलोचे साधारणपणे ६०० ते ७०० सिलिंडर या प्रकल्पातून उत्पादित केले जाणार आहेत. त्यातील कोणता ऑक्सिजन किती, कुणाला मिळणार त्याबाबत संबंधितांकडून अद्याप तरी कोणतेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत. मात्र, हा ऑक्सिजन किमान काही रुग्णांचा जीव वाचवण्यास उपकारक ठरू शकणार आहे.