शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब लिलावास प्रारंभ

By admin | Updated: July 19, 2016 00:34 IST

सटाणा : शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

सटाणा : राज्य सरकारने शेतमाल अडतमुक्त करण्याचे धोरण जाहीर केल्याने त्याविरु द्ध व्यापाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पुकारल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाचा जो निर्णय होईल तो होईल तोपर्यंत शेतकऱ्यांना वेठीस न धरता खरेदी सुरू करावी, असे भाजपा-सेना युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद देत सोमवारपासून डाळींब खरेदीस सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोमवारी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, अ‍ॅड. वसंतराव सोनवणे यांनी येथील बाजार समितीचे प्रशासक चंद्रकात विघ्ने, सचिव भास्कर तांबे, व्यापारी महेश देवरे, संदीप देवरे, राजू खैरनार, बापू वाणी आदि व्यापार्यांची व माथाडी कामगारांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकीत डॉ. विलास बच्छाव यांनी शेतकऱ्यांची आत्ताची आर्थिक स्थिती निदर्शनास आणून दिली. आधीच शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. आपला सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची अत्यंत वाईट स्थिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शासनस्तरावर जो काही निर्णय होईल तो आम्ही मान्यच करू परंतु कर्जाच्या खाईत लोटला जाणारा शेतकरीला होत देण्यासाठी लिलाव सुरू करावे असे आवाहन केले. त्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी डाळिंबाचे लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेऊन तत्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात आली . आज सुमारे साडेतीन हजार क्र ेट डाळिंबाचा लिलाव झाला. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)