शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन रिक्षासेवेला प्रारंभ

By admin | Updated: October 25, 2015 22:45 IST

चांगला प्रतिसाद असल्याचा संयोजकांचा दावा

नाशिक : नागरिकांना हव्या त्यावेळी आणि हव्या त्या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी आता अ‍ॅपद्वारे रिक्षा नोंदविण्याच्या सेवेला प्रारंभ झाला असून, त्याला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. विशेष म्हणजे सध्या अल्प रिक्षा उपलब्ध होत असल्या तरी कोणत्याही स्थानिक रिक्षाचालकाला कंपनीशी संलग्न होऊन व्यवसाय करता येणार आहे.नाशिकमध्ये आता ओला, टॅक्सी फॉर शुअर यासारख्या कंपन्यांनी टॅक्सी सेवा सुरू करून काही महिने उलटले आहेत. अ‍ॅपद्वारे किंवा कॉल सेंटरवर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून टॅक्सी मागविता येते. चांगल्या दर्जाची कार आणि तीही वातानुकूलित असल्याने नागरिकांना या सेवांनी आकर्षित केले आहे. पाठोपाठ उबेर कंपनीनेही नाशिककडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये रिक्षासेवेच्या तुलतेन अशाप्रकारच्या टॅक्सीने जाणे सोयीचे होतेच, शिवाय ठरल्यानुसारच भाडे आकारले जात असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत नाही, असे अनेकांचे मत आहे. परंतु त्याही पुढे जाऊन नागरिकांना आॅनलाइन म्हणजे मागणीनुसार रिक्षासेवा सुरू करणारी जुगनू रिक्षा सेवा सुरू झाली आहे. अ‍ॅपद्वारे किंवा कंपनीने विहित केलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर लगेचच त्या प्रवाशाला हव्या त्या ठिकाणी रिक्षा उपलब्ध होते. रिक्षाचालक कोठे जाण्यास तयार होतो कधी होत नाही. भाडे आरटीओने निर्धारित केल्याप्रमाणे कधीच नसतात. शिवाय प्रवासी कोंबून शेअर रिक्षाद्वारे नेले जाते, या सर्व कल्पनांना फाटा देणारी आता खासगी कंपनीची सेवा असून, ठरावीक भाडे आकारले जाते. सध्या पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे ही सेवा सुरू झाली आहे. गेल्या १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या सेवेसाठी जुगनू कंपनीने १५ रिक्षाचालकांना सहभागी करून घेतले आहे. टॅक्सीसेवेप्रमाणेच ही सेवा सुरू आहे. टॅक्सीसेवेला स्थानिक रिक्षाचालकांनी विरोध केला असून त्यामुळे व्यावसायावरच प्रतिकूल परिणाम झाल्याची त्यांची तक्रार होती. परंतु आता कोणताही रिक्षाचालक या कंपनीच्या माध्यमातून पारदर्शक सेवा देऊ शकेल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनप्रितसिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)