शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:29 IST

कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच पोषण आहार अभियानातदेखील प्रभावी उपाययोजना होणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील अभियानात सर्वसमावेशक कामगिरी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले.

नाशिक : कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच पोषण आहार अभियानातदेखील प्रभावी उपाययोजना होणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील अभियानात सर्वसमावेशक कामगिरी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले.  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व केंद्र शासनाचे प्रतिनिधी सुरेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेप्रसंगी पगार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यशाळेत सहभागी झाले.  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कुपोषणासारख्या दुर्लक्षित विषयावर अधिक लक्ष देऊन अतिशय प्रभावीपणे कार्य केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहानेही त्यांना या कामात पाठिंबा दिला. कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानात जिल्ह्णाने चांगले काम करून पोषण आहाराचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्व विभागांच्या सहकार्याने जिल्ह्णात सर्व क्षेत्रात जलद गतीने काम सुरू असून राज्य पातळीवर जिल्ह्णाचा सन्मान होत आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून पोषण अभियानातही सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले.  प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी पोषण आहार अभियानाबाबत माहिती दिली. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी स्वच्छ अंगणवाडीबाबत माहिती देताना अंगणवाडीत शौचालय सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैयक्तिक स्वच्छता याबाबत माहिती दिली. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी सुरेंद्र सिंग यांनी स्तनपानाबाबत माहिती दिली तर अन्न व औषध विभागाचे अधिकारी देवरे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा परिषद आवारात विविध आहारांबाबत प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यशाळेस बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे यांनी केले.जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावाच्कार्यशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी स्वच्छ सर्वेक्षण, कुपोषण निर्मूलन, पंतप्रधान आवास योजना यामध्ये केलेल्या कामाप्रमाणे पोषण आहार अभियानातही काम करून नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद