शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:10 IST

सर्वतीर्थ टाकेद ,(राजेंद्र गायकवाड):इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा सर्वतीर्थ टाकेद क्षेत्री भरते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेस शेजारील जिल्हा व परिसरातून लाखो भाविक स्नान व दर्शनासाठी येत असतात.

ठळक मुद्दे सर्वतीर्थ टाकेद ,(राजेंद्र गायकवाड):इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा सर्वतीर्थ टाकेद क्षेत्री भरते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेस शेजारील

सर्वतीर्थ टाकेद ,(राजेंद्र गायकवाड):इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा सर्वतीर्थ टाकेद क्षेत्री भरते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेस शेजारील जिल्हा व परिसरातून लाखो भाविक स्नान व दर्शनासाठी येत असतात.यात्रेसाठी एसटी महामंडळाने इगतपुरी आगारातून, घोटी व भगूर अकोले येथून बसेसची व्यवस्था केली असल्याची माहिती इगतपुरी आगारप्रमुख संंदीप पाटील यांनी दिली आहे. तसेच यात्रेमध्ये पोलीस खात्यामार्फत पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी व विलास घिसाडी, सहायक उपनिरीक्षक बी.आर. जगताप यांनी बंदोबस्त तैनात केला आला आहे.या ठिकाणी शेकडो कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ग्रा.पं. टाकेदमार्फत सर्वांना पिण्यासाठी पाण्याच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच सुनंदा धादवड, ग्रामविकास अधिकारी आर.आर. इंगळे यांनी दिली. तसेच आरोग्य खाते, खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.आर. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम.बी. देशमुख, भारती सोनवणे, संतोष लेकुळे आरोग्य विभागाचे स्टॉल्स लावण्यात येणार आहे.तसेच धार्मिक विधी रात्री १२ वाजता सुरू करून यात्रेस प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त महंत किशोरदास गुरु गोदावरीदास वैष्णव यांनी दिली.तसेच विद्युत वितरण कंपनीमार्फत कनिष्ठ अभियंता तुषार राणे व सहायक अभियंता पाटील यांच्यासह म्हसाळ, वसंतराव बोडके, गणेश दौंड हे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी दक्षता घेणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच सुनंदा धादवड, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र परदेशी, विक्र मराजे भांगे, यशवंत धादवड, बबाबाई जाधव, गंगूबाई भले यांनी केले आहे.