शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भैरवनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ

By admin | Updated: April 22, 2016 01:16 IST

भाविकांची गर्दी : गंगाजलाच्या कावडीची मिरवणूक

 सिन्नर : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त गुरुवारी सकाळपासून भैरवनाथ महाराज मुखवट्याची, रथाच्या व गंगाजलाच्या कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारपासून सुरू झालेली यात्रा दोन दिवस चालणार आहे. नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील भैरवनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी जिल्हाभरातून भाविक आले होते.सकाळी ६ वाजता भैरवनाथ मंदिराचे मुख्य पुुजारी त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते रथपूजन करण्यात येऊन ढोल-ताशाच्या निनादात व टाळमृदंगाच्या गजरात रथाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. नाशिकवेस, गंगावेस, खडकपुरा, लाल चौक, महालक्ष्मी रोड, वावीवेस, लोंढे गल्लीतून गावठा, तानाजी चौक, गणेशपेठ, शिंपी गल्ली, नाशिकवेस अशा शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यावरून रथ व कावडींची मिरवणूक काढण्यात आली. रथाला श्रीफळ वाढवून दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात आली होती. पाचोरे घराण्याकडे रथ हाकण्याचा मान होता. रथावर दोन्ही बाजूस भालदार-चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालीत होते. रथ दर्शनासाठी आबालवृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. बैलाचा खांदा रथाच्या जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. सजवलेल्या बैलांना रथास जुंपल्यावर थोडासाच रथ पुढे सरकला की, दुसरा शेतकरी बैल घेऊन हजर राहत होते. दिवसभर ही लगबग सुरू होती. रथाच्या जुंवावर घरोघरी नारळ वाढविले जात होते. रथामागे कावडीधारक सहभागी झाले होते. लहान मुलांना कावडी खांद्यावर देऊन त्यांची ती आठवण जपून ठेवण्यासाठी छायाचित्र काढून घेण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू होती. रथाची पूजा करून त्या पाठोपाठ चालत असलेल्या कावडीधारकांना पाटावर उभे करून त्यांचे पाय धुऊन सुवासिनी कावडीधारकांच्या पदस्पर्शाने धन्य झाल्याच्या समाधानाने पूजेचे ताट सांभाळत मार्गस्थ होत होत्या. त्यांना गूळ-खोबरे, पेढे, खडीसाखर, फुटाणे यांचा प्रसाद दिला जाता होता. रथामागे असलेल्या कावडीधारकांचे पदप्रक्षालन व प्रसाद वाटपासाठी मोठी गर्दी झाली होती. रथामागे कावडी घेऊन पायी चालणाऱ्या कावडीधारकांना भाविकांकडून सरबत तसेच प्रसादाचे वाटप केले जात होते. (वार्ताहर)