शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

देवमामलेदार यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:13 IST

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास मंगळवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला.

ठळक मुद्देरथ मिरवणूक उत्साहात .....

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास मंगळवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला.पहाटे चार वाजता बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले व पालिकेच्या मुख्याधिकारी सौ.हेमलता हिले-डगळे , देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड व सौ.अरु णा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे व सौ.योगिता मोरे, यांच्या हस्तेदेवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.पहाटे तीन वाजेपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारु डे, भजने आदी कार्यक्र मांचे आयोजन केले होते. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणार्या शहनाई व सनई चौघड्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पहाटे बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सपत्नीक हस्ते महापूजेस सुरु वात झाली. महापूजेसाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महापूजेचे पौरोहित्य राजेंद्र कुलकर्णी, परिमल जोशी, मकरंद पाठक, संजय चंद्रात्रे प्रा.धनंजय पंडित, संजय चंद्रात्रे, पियुष गोसावी, आबा मुळे, पंकज इनामदार, बाळ पाठक, विनायक कुलकर्णी, रोहित देशपांडे आदींनी केले., बबन मुळे, भास्कर जोशी, गजानन जोशी, अभय चंद्रात्रे, कौस्तुभ पिसोळकर, ऋषी चंद्रात्रे शरद गुरव आण िपप्पू गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले. तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा आज सकाळी प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व सौ.स्नेहा धिवरे यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे चार वाजता सालाबादाप्रमाणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, भारती कदम, राजेश भोपळे, श्रद्धा भोपळे, पोलीस हवालदार जिभाऊ पवार व उषा पवार यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. तुषार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम , सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. यांच्या सपत्नीक हस्ते महाराजांच्या रथमिरवणुकीस सुरु वात होणार आहे. (०१ सटाणा १)रथ मिरवणूक उत्साहात .....महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त आज सायंकाळी पाच वाजता मालेगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे,प्रांत प्रवीण महाजन यांच्या हस्ते सपत्नीक रथाचे पूजन करण्यात आले.त्यानंतर महापुजेचे मानकरी प्रभारी तहसीलदार प्रमोद हिले ,जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव शिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम ,नगराध्यक्ष सुनील मोरे ,देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड ,सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे,देवस्थानचे विश्वस्त रमेश देवरे ,विजय पाटील ,हेमंत सोनवणे ,राजेंद्र येवला यांच्या हस्ते रथ ओढून चावडी रोडने रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.मुंबई येथील भांगडा नृत्य पथक लेझीम पथक,टिपरी पथक,आदिवासी नृत्य सादर करत ढोलताशाच्या गजरात कॅप्टन अनिल पवार चौक मार्गाने सरकारी दवाखाना,शिवाजी चौक,टीडीए रोड,मल्हार रोडवरून पोलीस चौकी मार्गे सोनार गल्ली ,महालक्ष्मी मंदिर मार्गाने रथ यात्रा काढण्यात आली . रथ मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी सडा आण िरांगोळ्या घालून सजवला होता.तर मिरवणुकी दरम्यान भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी पाण्याची व प्रसादाची व्यवस्था केली होती.दरम्यान मुंबई येथील भांगडा नृत्य पथक व नंदुरबार येथील आदिवासी नृत्य पथक रथ मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.