शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्यपर्व सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:30 IST

सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाधी साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जयोस्तुते ।। असा जयघोष करत नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. २१)पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

नाशिक : सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाधी साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जयोस्तुते ।।असा जयघोष करत नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. २१)पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे साडेपाच वाजता जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते कालिका देवीची पारंपरिक पद्धतीने पूजन करून घटस्थापना करण्यात आली. याशिवाय अन्य देवी मंदिरांतही आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झाली.पहाटे महापूजा झाल्यानंतर सकाळी ७ वाजता महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते अभिषेक करून देवीची आरती करण्यात आली. गुरुवारी पहाटेपासूनच कालिका देवी मंदिरात सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. देवीभक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी सर्व भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी कालिका देवी मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करत नाशिककरांनी मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेण्याचे अवाहन केले. यावेळी नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेवक शालिनी पवार, पोपटराव भानसी यांच्यासह कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, सुरेंद्र कोठावळे, आबा पवार, विजय पवार, संतोष कोठावळे आदि उपस्थित होते. नेहेमीप्रमाणे देवीची यात्रा सुरू झाली असली तरी यंदा प्रशासनाने मूर्तींचे स्टॉल्स उभारण्यास निर्बंध घातल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले नाही. अनेक छोट्या आणि खेळणी, फुगे तसेच अन्य साधने विक्रेत्यांनी थेट रस्त्याच्या कडेला ठाण मांडून विक्री करण्यास सुरूवात केली आहे. सांडव्यावरील देवी मंदिरात तसेच शहरातील पूरातन ग्राम देवता भद्रकाली मंदिरातही उत्साहात घटस्थापना करण्यात आली.