शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भगूर-धामणगाव बससेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:31 IST

भगूर ते धामणगाव एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एस.टी. महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी देवळाली कॅम्प भाजपने केली आहे.

ठळक मुद्देमागणी : भाजपच्या वतीने निवेदन

भगूर : येथील बसस्थानकातून भगूर ते धामणगाव एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एस.टी. महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी देवळाली कॅम्प भाजपने केली आहे.इगतपुरी तालुक्यातील धामणगावजवळ सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. याठिकाणी विविध शाखांचे डॉक्टर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात तर कमी पैशात काही मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने येथे दररोज विविध आजारांचे शेकडो रुग्ण जात असतात. या ठिकाणी भगूर, देवळाली कॅम्प परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक जातात त्यामुळे सध्या भगूर बसस्थानकातून रुग्णालयात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत असते. परंतु येथे जाण्यासाठी ग्रामीण एसटी बस डेपोची इगतपुरीपर्यंत एक आणि घोटीमार्गे धामणगाव तर हरसाळे, वंजारवाडी अशी एक बस जाते.प्रवाशांची संख्या विचारात घेता, सुरक्षित प्रवास करण्यासाठी भगूर बसस्थानकातून सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन दोन तासांच्या अंतराने सिटी बस चालू करावी, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष संजय बलकवडे, नीलेश हासे, प्रताप गायकवाड, अण्णाजी कापसे, शशिकांत घुगे, कार्तिक बलकवडे, संजय कडभाने, श्याम भागवत, विलास कुलकर्णी यांनी केली आहे.प्रवाशांची गैरसोयबसची संख्या कमी असल्याकारणाने प्रवाशांना तासन् तास बसची वाट पहात ताटकळावे लागते. परिणामी त्यांना टॅक्सी, रिक्षा वा मिळेल त्या वाहनाने जादा पैसे मोजावे लागतात. त्यासाठी क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने भगूर ते एसएमबीटी मार्गावर दररोज हजारो प्रवासी जीवघेणे प्रवास करतात.

टॅग्स :Bus Driverबसचालक