शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार’चे प्रक्षेपण महागणार

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

केबल दरात वाढ शक्य : नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

नाशिक : स्टार या मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या खासगी दूरचित्रवाहिनीने आपले प्रत्येक चॅनल पे केल्याने येत्या नोव्हेंबरपासून केबलचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यापुढे केबल ग्राहकाला हवे असलेले परंतु पैसे अदा करण्याची तयारी असलेलेच स्टारचे चॅनल दूरचित्रवाहिन्यांवरून पाहता येतील.स्टार कंपनी व हॅथवे या खासगी दूरचित्रवाहिन्यांचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या कंपनीत झालेल्या तंट्याची सुनावणी दिल्लीच्या ‘टीव्ही सॅट’ या प्राधिकरणाकडे अलीकडेच झाली. त्यात स्टार कंपनीने यापुढे स्टार कंपनीचे चॅनल कोणत्याही पॅकेजविना न दाखविता प्रत्येक चॅनलसाठी वेगवेगळे दर आकारले जातील असे लिहून दिले व त्याची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबरपासून करण्याचे ठरविण्यात आले आहे. देशपातळीवर स्टार कंपनीने हे धोरण स्वीकारल्याने आता केबलद्वारे स्टारचे चॅनल प्रसारित करणाऱ्या कंपन्यांनाही त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. सध्या स्टार कंपनीचे स्टार गोल्ड, स्टार प्रवाह, स्टार न्यूज, स्टार मुव्ही, स्टार स्पोर्ट असे सुमारे ३० हून अधिक चॅनल्स सुरू आहेत. यापूर्वी स्टारचे सर्व चॅनल एकाच पॅकेजमध्ये आणून ते केबलद्वारे प्रक्षेपित केले जात. यापुढे मात्र आता प्रत्येक चॅनलचे वेगवेगळे दर असणार आहेत. केबलचालकाकडून प्रत्येक ग्राहकाची आवड विचारूनच सदरचे चॅनल दाखविले जातील व त्यासाठी नियमित केबल शुल्कापेक्षा अधिकची रक्कम अदा करावी लागणार आहे. स्टार चॅनलचे सर्व पॅकेज घेतल्यास ग्राहकाला साधारणत: पन्नास रुपयांइतके अधिकचे शुल्क भरावे लागेल. नाशिक शहरात डेन व इन या दोन कंपन्यांकडून १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.