शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शिवसेना ठरविणार स्थायी समिती सभापती

By admin | Updated: July 24, 2016 23:06 IST

मालेगावी शिवसेना ठरविणार स्थायी समिती सभापती

आझादनगर : मालेगाव महापालिकेच्या २६ जुलै मंगळवारी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होत असून, दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी समान बलाबल असल्याने लढत चुरशीची होणार आहे. विजयासाठी सदस्याला आपआपल्या तंबूत खेचण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, तर उमेदवार अबाधित राखण्यासाठी एका गटाकडून सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे.स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. विजयासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता आहे. शहरविकास आघाडीचे युनुस इसा व तिसरा (आघाडी) महाजतर्फे एजाज बेग रिंगणात आहेत. युनुस इसा यांनी गत स्थायी समिती सभापती निवडणुकीत तिसरा महाजचे मोहंमद एजाज मोहंमद वजीर व मोहंमद युसुफ अब्दुल कादीर यांना आपल्याकडे खेचून घेत काँग्रेसच्या ताहेरा शेख रशीद यांना स्थायी समिती सभापतीपदी विराजमान केले होते. याचीच परतफेड म्हणून काँग्रेसने आपले पाच सदस्यीय बल युनूस इसा यांना दिले आहेत. काँग्रेसचेच पाच व शहरविकास आघाडीचे दोन असे सात सदस्य युनुस इसांच्या पाठीशी आहेत. तिसरा महाजकडे स्वपक्षाचे पाच सदस्य असून जनता दलाचे बुलंद एकबाल व मालेगाव विकास आघाडीचे सुनील गायकवाड असे एकूण दोन सदस्य एजाज बेग यांच्या तंबूत आहेत; मात्र दोन्ही उमेदवारांना विजयासाठी सेनेच्या दोन सदस्यांवर अवलंबून रहावे लागणार आहेत. परिणामी विजयाची मदार सेनेच्या कौलावर आहे. सेनेचे दोन सदस्यांपैकी दिलीप पवार युनुस इसांच्या संपर्कात आहेत. श्निवारी राज्यमंत्री दादा भुसे शहरात दाखल झाले. त्यांनी सेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली. (वार्ताहर)