शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पंचवीस लाखांपुढील खरेदीसाठी स्थायी समितीची मान्यता बंधनकारक

By admin | Updated: May 21, 2014 00:37 IST

ठराव संमत :

ठराव संमत :नाशिक : जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाला २५ लाखांपुढील कोणत्याही साहित्य खरेदीची शासन दरकरारानुसार खरेदी करावयाची असल्यास यापुढे त्या-त्या विषय समित्यांमध्ये त्याची चर्चा होऊन स्थायी समितीत त्या खरेदीला प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक करावे, असा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.रावसाहेब थोरात सभागृहात स्थायी समितीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष जयश्री पवार, उपाध्यक्ष संपतराव सकाळे, सभापती अलका जाधव, राजेश नवाळे, सुनीता अहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सदस्य रवींद्र देवरे, केदा अहेर, प्रवीण जाधव, प्रा. अनिल पाटील, गोरख बोडके, प्रकाश वडजे आदि उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी १५ मे रोेजीच्या शासन परिपत्रकाचे वाचन केले. त्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांचे आधी समायोजन करायचे व नंतर यथावकाश शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित करून त्यानंतरच बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रा. अनिल पाटील यांनी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती तातडीने कराव्यात, अशी मागणी केली. सुखदेव बनकर यांनी आचारसंहिता असल्याने केंद्रप्रमुखांची पदोेन्नतीची कार्यवाही करता आली नाही; आता मात्र तत्काळ करण्यात येईल, असे स्पष्ट केले. राजेश नवाळे यांनी कर्मचार्‍यांच्या बदल्या करताना पेसानुसार कार्यवाही केल्याने बिगर आदिवासी भागातील पदे मोेठ्या प्रमाणात रिक्त होत असल्याने पदांचा समतोल राखावा, अशी सूचना केली. रवींद्र देवरे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत असलेल्या तीन पाणीपुरवठा योजनांची थकबाकी का वाढली, अशी विचारणा केली. त्यावर कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी यावर्षी ७२ लाखांची (५२ टक्के) वसुली करण्यात आली असून, मूळचीच थकबाकी जास्त असल्याचे सांगितले. प्रवीण जाधव व केदा अहेर यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या विरोधातील चौकशी समितीची कार्यवाही कुठपर्यंत आली, याची विचारणा केली. पुढील सभेपर्यंत या चौैकशीचा अहवाल सभेवर ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. यापुढे कोेणत्याही विभागात कुठलीही खरेदी करताना त्या-त्या विषय समितीत त्या खरेदीची चर्चा करून शासकीय दरकरार असला तरी २५ लाखांपुढील खरेदीसाठी स्थायी समितीची प्रशासकीय मान्यता बंधनकारक राहील, असा ठराव रवींद्र देवरे यांनी मांडला तो संमत करण्यात आला. बैठकीस सुरुवातीस डॉ. राजपूत नसल्यानेे सदस्यांनी त्यांची विचारणा करताच त्यांना सभागृहात चर्चेसाठी बोलावण्यात आले. (प्रतिनिधी)